Amravati Loksabha Constituency News:  
लोकसभा २०२४

Amravati News: अमरावती लोकसभा निवडणुकीतून RPIच्या राजेंद्र गवई यांची माघार; सामान्य कार्यकर्त्याला दिली उमेदवारी

Amravati Loksabha News: डॉ. राजेंद्र गवई यांनी त्यांच्या आरपीआय पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी घोषित केली आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. ७ एप्रिल २०२४

Amravati Loksabha Constituency News:

अमरावती लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आता डॉ. राजेंद्र गवई यांनी त्यांच्या आरपीआय पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी घोषित केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याचे जाहीर केले होते. मात्र आता डॉ. राजेंद्र गवई यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसेच डॉ. राजेंद्र गवई यांनी त्यांच्या पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी घोषित केली आहे.

तत्पुर्वी राजेंद्र गवई यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना पाठिंबा मागितला होता मात्र प्रकाश आंबेडकर यांनी घराणेशाहीला विरोध केला असल्याने गवई यांनी त्यांच्या पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीला राजेंद्र गवई यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, गवई यांनी माघार घेतल्यानंतर आता प्रकाश आंबेडकर राजेंद्र गवई यांच्या आरपीआयला पाठींबा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राजेंद्र गवई यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) बळवंत वानखडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापुरात व्यावसायिक सिलिंडरचा काळाबाजार ?

चांगल्या आयुष्यासाठी असेल तर मला तुझं...; उच्चशिक्षित महिलांच्या रांगा, योनी शुद्धीकरण, खरातचा धक्कादायक कारनामा उघड

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी बीडच्या महिला नेत्याचे नाव चर्चेत; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

अशोक खरातला भर चौकात गोळ्या घाला; कुणी केली मागणी? VIDEO

Mumbai : भयंकर! दारूनं केली संसाराची राखरांगोळी; नवऱ्याच्या डोक्यात धुंदी चढली, बायकोला निर्घृणपणे संपवलं

SCROLL FOR NEXT