raju shetti demands inquiry of sangli dcc bank  Saam Digital
लोकसभा २०२४

Raju Shetti News: 'माझं काय चुकलं! शेतकऱ्यांनो तुम्हीही...' लोकसभेतील पराभव राजू शेट्टींच्या जिव्हारी; भावनिक पोस्ट चर्चेत

Raju Shetti Facebook Post: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनाही निसटता पराभव झाला. या पराभवानंतर राजू शेट्टी यांनी फेसबूक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Gangappa Pujari

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. लोकसभा निवडणुकीत अनेकांना पराभवाचा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनाही निसटता पराभव झाला. या पराभवानंतर राजू शेट्टी यांनी फेसबूक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हातकणंगले लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे नेते धैर्यशिल माने, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित आबा पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. या लढतीत शिंदे गटाच्या धैर्यशिल माने यांचा विजय झाला तर राजू शेट्टी यांना पराभवाची चव चाखावी लागली. या लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांचा १४ हजार मतांनी निसटता पराभव झाला.

मात्र स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा तब्बल तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. हा पराभव राजू शेट्टी यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. यावरुनच त्यांनी फेसबूक पोस्ट करत थेट शेतकऱ्यांना सवाल केला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

या पोस्टमध्ये राजू शेट्टी यांनी माझं काय चुकलं? प्रामणिक असणे हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांनो तुम्हीही.. असा सवाल उपस्थित केला आहे. राजू शेट्टी यांच्या या पोस्टने सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तसेच अनेकांनी त्यावर कमेंट करत या पराभवाबद्दल सहानुभूती दर्शवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

SCROLL FOR NEXT