Praful Patel Jiretop Controversy 
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

Praful Patel Jiretop Controversy: प्रफुल्ल पटेलांनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्रिगेडनं दिलाय. तर या वाटावरून ठाकरे गटानं मोदींनाच लक्ष्य केलंय. यावरचा हा विशेष रिपोर्ट...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद पाटील

मुंबई : जिरेटोपचा वाद प्रफुल्ल पटेलांना चांगलाच भोवलाय. सर्वच स्तरांमधून संतापाची लाट उसळल्यामुळे पटेलांनी यावर सारवासारव करत स्पष्टीकरण दिलंय. मात्र माफी न मागितल्यामुळे संभाजी ब्रिगेडनं मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय. पटेलांनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्रिगेडनं दिलाय. तर या वाटावरून ठाकरे गटानं मोदींनाच लक्ष्य केलंय. यावरचा हा विशेष रिपोर्ट.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप चांगलाच भोवलाय. वाराणसीत मोदींना जीरेटोप घालून केलेल्या सत्कार समारंभाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. विविध संघटनांसह इतिहासकार, राजकीय विरोधक आणि महायुतीतल्या मित्रपक्षांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली, त्यामुळे पटेलांवर सारवासारव करत स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. एक्सवर दिलेल्या स्पष्टीकरणात पटेल नेमकं काय म्हटले ते पाहूयात.

जिरेटोपवर हे स्पष्टीकरण कुणाला 'पटेल'?

"हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ." असं ट्विट पटेल यांनी आपल्या स्पष्टीकरणात केलंय.

मात्र यात त्यांनी ना कुठे दिलगिरी व्यक्त केली.ना माफी मागितली. त्यामुळे त्यांच्या या स्पष्टीकऱणावर अनेकांनी नापसंती व्यक्त केलीय. संभाजी ब्रिगेड तर पटेलांच्या माफीनाम्यावर ठाम आहे. पटेलांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय. तर पटेलांनी केलेल्या या सत्काराच्या निमित्तानं विरोधकांनी मोदींवरही टीकेची झोड उठवलीय. खासदार संजय राऊत यांनी तर पटेल आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित असलेल्या इकबाल मिरचा दाखला देत मोदींवर निशाणा साधलाय.

प्रफुल्ल पटेलांनी आपल्या स्पष्टीकरणात यापुढे काळजी घेऊ असं नमूद केलंय. म्हणजे चूक झाली हे त्यांना मान्य आहे. तर मग माफी मागण्यात त्यांना का कमी कमीपणा वाटतोय? ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी हा मुद्दा जर अधिक ताणला तर महायुतीची डोकेदुखी वाढू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Pune Mhada: पुणे म्हाडाच्या ४१८६ घरांसाठीची सोडत पुन्हा लांबणीवर; आता नवीन तारीख काय?

Emraan Hashmi : सई ताम्हणकरनंतर 'ही' मराठमोळी अभिनेत्री इमरान हाश्मीसोबत झळकणार, पाहा VIDEO

Maharashtra Weather: महाराष्ट्रात थंडीची लाट कायम, हुडहुडी भरली अन् शेकोट्या पेटल्या; आज कुठे कसं हवामान?

Expressway Accident : हायवेवर पहाटे काळाचा घाला, ७ बसे अन् ३ कार जळून खाक, ७ जणांचा जळून मृत्यू, २५ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT