Vijay Shivtare
Vijay Shivtare Saam Tv
लोकसभा २०२४

Vijay Shivtare News: ठरलं! बारामती लोकसभा अपक्ष लढवणार; विजय शिवतारेंची मोठी घोषणा

मंगेश कचरे

Baramati Loksabha Constituency News:

शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी मध्यस्थी करुनही विजय शिवतारे हे निवडणूक लढण्यावर ठाम असून आज (ता. २४ मार्च) झालेल्या बैठकीत त्यांनी १२ एप्रिल रोजी अपक्ष निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बारामती लोकसभा लढणारचं.. शिवतारेंची घोषणा!

एकीकडे बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनीही कोणत्याही परिस्थितीत बारामतीमधून लोकसभा लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बैठकीत काय म्हणाले विजय शिवतारे?

"आम्हाला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार पण नको आहेत. गावागावात सर्व कार्यकर्त्यांनी जाऊन सांगा विजय शिवतारे ही निवडणूक लढणार आहेत. १ एप्रिलला पुरंदरच्या पालखी तळावर या लढाईचा बिगुल वाजवायचा आहे. पुरंदरमधील सर्वपक्षीय नेत्यांना एक एप्रिलच्या बैठकीला निमंत्रण देणार असल्याचे," विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

१२ एप्रिलला अर्ज दाखल करणार!

तसेच "राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मी शरद पवार यांचा माणूस असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र मला फक्त अजित पवार यांचा पराभव करायचा आहे. मी लढतोय ते जिंकण्यासाठी असे म्हणत १ तारखेला पालखी तळावर सभा घेणार आणि १२ एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणाही शिवतारेंनी केली आहे. तसेच ही लढाई मला लढू द्या," अशी विनंतीही त्यांनी शिंदे- फडणवीसांना केली. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Unseasonal Rain: अवकाळीच्या तडाख्याने भलेमोठे झाड कोसळले, ५ घरे जमीनदोस्त; चिमुकलीसह वृद्ध दांपत्य जखमी

Thane Election Voting LIVE : ठाण्यात ईव्हीएम मशीनचा खोळंबा, मतदार ताटकळले

Maharashtra Rain Update: राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, कोणत्या जिल्ह्यांमध्ये घातलं अवकाळी पावसानं थैमान?

Pune Traffic News : पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; मेट्रोच्या कामामुळे 'या' भागातील रस्ते राहणार बंद

Narendra Modi: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात विक्रमी मतदान करा; पंतप्रधान मोदीचं मतदारांना आवाहन

SCROLL FOR NEXT