Maharashtra Politics| Sharad Pawar News Saamtv
लोकसभा २०२४

Loksabha Election: राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता; माढा- साताऱ्यातून कोण 'तुतारी' वाजवणार?

NCP Sharad Pawar Group Candidate: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या यादीमध्ये कोणाला लोकसभेचे तिकीट मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Politics News:

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांचा तिढा कायम आहे. यासाठी महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या यादीमध्ये कोणाला लोकसभेचे तिकीट मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Loksabha Election 2024)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या या यादीमध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे , नगरमधून निलेश लंके, तसेच दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यानंतर आज शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या यादीमध्ये सातारा, रावेर, बीड, माढा आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून यापैकी किती जागांवरील उमेदवार आज जाहीर होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

माढा- साताऱ्याचा तिढा सुटणार का?

दरम्यान, शरद पवार गटाकडे माढा आणि सातारा मतदार संघ आहेत. यापैकी माढ्यामध्ये नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. माढ्यातून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती, मात्र ऐनवेळी महादेव जानकरांनी महायुतीची वाट धरली. त्याचसोबत रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीमुळे नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटीलांच्याही नावाची चर्चा आहे.

तसेच साताऱ्यातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता उदयनराजेंविरोधात नवा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साताऱ्यातून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील तसेच काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT