Sangli Loksabha Election 2024: Saamtv
लोकसभा २०२४

Sangli Loksabha: सांगली लोकसभेचा हार नेमका कोणत्या 'पाटलांच्या' गळ्यात? ठाकरेंकडून उमेदवाराची घोषणा; काँग्रेसकडून टोकाचा इशारा

Gangappa Pujari

Sangli Loksabha Election 2024:

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठकांचा धडाका सुरू आहे. अशातच काही जागांवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला असून उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे. यामध्ये सांगली लोकसभेचाही समावेश आहे. सांगलीमधून उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. तर काँग्रेसकडून विशाल पाटील इच्छुक आहेत. त्यामुळे ठाकरेंनी उमेदवार घोषित केला आम्ही सांगलीच्या जागेवर ठाम आहोत, असे स्पष्ट मत काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केले आहे.

काय म्हणालेत विश्वजित कदम?

"सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. काँग्रेसच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याही मित्र पक्षाने यावर कोणताही दावा करु नये.आम्ही या जागेवर ठाम आहोत, असे म्हणत ⁠सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही," असे विश्वजित कदम यांनी सांगितले आहे.

तसेच "⁠उमेदवाराला विचारांची पाठराखण लागते. ⁠सांगलीकरांनी यावर निर्णय घेतला आहे. ⁠काँग्रेसची या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेत ताकत आहे. ⁠संजय राऊत हे शिवसेना पक्षाचे नेते आहेत. ते वैयक्तीक काही सांगीत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र आम्ही ही जागा सोडणार नाही, ⁠चंद्रहार पाटील आमचे मित्र आहेत. ⁠या जागेसाठी टोकाची भुमिका घ्यावी लागली तरी चालेल मात्र आम्ही ही जागा सोडणार नाही," असेही विश्वजित कदम म्हणालेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, सांगली लोकसभेबाबत आज काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विश्वजित‌ कदम तसेच संभाव्य उमेदवार विशाल पाटील हेही बैठकीला उपस्थित होते. ठाकरे गट आणि काँग्रेस दोन्हीकडून या जागेवर दावा केला जात असल्याने नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

SCROLL FOR NEXT