Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिकची जागा सोडणार नाही; शिंदे गटाच्या आमदारांचा निर्धार

Lok Sabha Election 2024 : आज एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिकची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही, असा निर्धार करण्यात आला आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Politics 2024

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू आहे. एकीकडे नेते तयारीला लागले आहेत. मात्र महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान आज एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिकची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही, असा निर्धार केला आहे. त्यामुळे जागावाटपावरून महायुतीत पुन्हा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

महायुती करताना काही तडजोडी कराव्या लागतात. मात्र आपल्या कोणत्याही विद्यमान खासदारांवर अन्याय होणार नाही असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आपण धाडस केलं म्हणून अनेकांना सत्तेची फळं चाखता आली . त्यामुळे कुणी कितीही सांगितलं तरी आपलं महत्त्व कमी होत नाही, आपल्या हक्काच्या जागा आपण सोडायच्या नाहीत, असंही काही आमदार या बैठकीत म्हटल्याची माहिती आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिक आपल्या जागा आपण सोडायच्या नाहीत. परभणी, उस्मानाबाद या हक्काच्या जागा आपण मित्र पक्षाला दिल्या. आपण युती धर्म प्रामाणिकपणे पाळतोय. रायगडात आपल्या आमदारांनी अपमान गिळून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपले उमेदवार जिथे आहेत तिथे मित्र पक्षानेही सहकार्य आणि मदतीसाठी तयार असायला हवे. ठाणे आपलेच आहे. नाशिक आपले आहे आपल्या हक्काच्या जागा आपण सोडायच्या नाहीत. पालघरही देऊ नका अशी भूमिका मांडण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी सर्वांच्या भावना समजून घेतल्या. युती करताना काही तडजोडी कराव्या लागतात, परंतु कोणावर अन्याय होणार नाही, अशा निश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात ४५ पारचं लक्ष गाठण्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी भाजपने शिवसनेच्या काही जागांवर आपला दावा केला आहे. भाजपने अनेक मतदारसंघात सर्वे केला होता. त्यात अनेक जागांवरील विद्यमान खासदारांबाबत नाराजीचा सूरू असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. त्यामुळे निवडून येतील असे उमेदवार देण्यावर भाजपने भर दिला आहे.

नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यास भाजपचा विरोध आहेत. स्थानिक भाजप नेत्यांनीही ही जागा भाजपने लढवण्याचा आग्रह धरला आहे. हेमंत गोडसे यांच्याजागी आता राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्या नावाचीही चर्चा आहे.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघातूनही भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे. येथे संजय राठोड यांच्या नावाचा सध्या विचार सुरु आहे. ठाण्यातील जागेवरही भाजपने दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: आधी देशात दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचे सरकारला ओपन चैलेंज,काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

SCROLL FOR NEXT