Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : उद्धव ठाकरेंमुळे गोविंदाला थांबावं लागलं हॉटेलबाहेर, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची उडाली धावपळ; नेमकं काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. राजकीय नेत्यांचे सतत दौरे सुरू आहेत. याच प्रचाराच्या धामधुमीत संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे आणि गोविंदा हॉटेलमध्ये एकत्र आल्यामुळे नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. राजकीय नेत्यांचे सतत दौरे सुरू आहेत. याच प्रचाराच्या धामधुमीत संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे आणि गोविंदा हॉटेलमध्ये एकत्र आल्यामुळे नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचं पहायला मिळाली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेता गोविंदाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे २० मिनिटे हॉटेलबाहेर थांबावं लागलं आहे. गोविंदाला त्याच्या रूमपर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली. काल रात्रीपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हॉटेल रामामध्ये मुक्कामी आहेत. त्याच हॉटेलमध्ये शिवसेनेचे संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी आलेला अभिनेता गोविंदाही रात्रीपासून मुक्कामी आहे. या दोघांच्याही रूम्स एकाच मजल्यावर आहेत. आज दुपारी गोविंदा हॉटेलमधून बाहेर पडून शहरात गेला होता.

त्यानंतर दुपारी पावणे तीनच्या सुमारास तो हॉटेलच्या गेटवर पोहचला. त्याचवेळी उद्धव ठाकरे हे जालन्याच्या सभेला जाण्यासाठी रवाना होत असल्याची धावपळ सुरू झाली. हे गोविंदा सोबत असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळल्यानंतर गोविंदाला त्यांनी हॉटेलच्या बाहेर आडोशाला थांबवले. पण उद्धव ठाकरे हे काही लवकर बाहेर पडले नाहीत. शेवटी २० मिनिटे वाट पाहून गोविंदा हॉटेलमध्ये येऊन रूममध्ये न जाता रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथेही १५- २० मिनिटे थांबले आणि उद्धव ठाकरे हे रूममधून बाहेर पडण्याचा अंदाज घेऊन गोविंदा आपल्या रूममध्ये दाखल झाला. ही सगळी नाट्यमय घडामोड पत्रकार, पोलीस आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या समोर घडली.

उद्धव ठाकरे यांची जालना येथील सभेला उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती राहणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संबोधित करणार होते. मात्र खराब हवामानामुळे उद्धव ठाकरे सभेला पोहोचणार नसल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? अधिकृत तारीख आली समोर

State Marathi Film Awards2025: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा दणक्यात साजरा; कोणकोणत्या नामवंतांचा झाला गौरव? वाचा यादी

Nanded Crime:शिवसेना पदाधिकाऱ्याचा कारमाना;'स्पा सेंटर'च्या नावाखाली चालवायचा कुंटणखाना

Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; नांदेडचे दहा पर्यटक अडकले, VIDEO

Mahadevi Elephant:'महादेवी'साठी मुख्यमंत्र्यांचा बैठकीत मोठा निर्णय; हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर

SCROLL FOR NEXT