Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : शरद पवार-ठाकरेंना पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी, इचलकरंजीतल्या सभेत अनेक जण धडपडले; VIDEO

Ichalkaranji MahaVikas Aaghadi Sabha : महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या इचलकरंजीतल्या सभेत हाउसफुल गर्दी झाली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये चेंगराचेंगरीही झाल्याची माहिती आहे.

Sandeep Gawade

महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या इचलकरंजीतल्या सभेत हाउसफुल गर्दी झाली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये चेंगराचेंगरीही झाल्याची माहिती आहे. सभास्थळ नागरिकांनी भरून गेल्याने मिलिंद नार्वेकरांनी पोलिसांना विनंती करत डी झोनमध्ये नागरिकांना बसवण्याची केली.सभास्थळावर जागा मिळत नसल्यामुळे नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शरद पवारांनी काही काळ भाषण थांबवलं होतं. यावेळी डी झोनमध्ये जाण्यासाठी धावपळ झाल्यामुळे काहीजण जमिनीवर कोसळल्याचं पहायला मिळालं.

महाविकास आघाडीची आज इचलकरंजीत सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिंदे गटावर जोरदार टीका केली. महाराष्ट्राबाबतचा आकस हा महाराष्ट्र स्थापनेवेळी दिसला होता. मोरारजी देसाई यांनी मराठी माणसांना मारण्याचा आदेश दिला होता. आताही काही महाराष्ट्र लुटत आहेत. मात्र, त्यांचा सुफडासाफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

महाराष्ट्रात येणारे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवले जात आहेत. वेदांता-फॉक्सकॉन, मेडिकल डिव्हाईस पार्क, टाटा-एयरबस प्रोजेक्ट असे सर्वच प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन गेले. आता एलॉन मस्क यांच्या टेस्लाचा आणखी एक उद्योग आपल्याकडे येत आहे. मात्र, एलॉन मस्क यांनी दौरा रद्द केला. अन्यथा त्यांनाही गुजरातला घेऊन गेले असते. एलॉन मस्क हुशार आहेत. त्यांना गुजरातला जायचं नाही. कारण त्यांनाही कळले असेल की, देशातील सरकार बदलत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Accident : कर्जत-लोणावळाजवळ रेल्वेचा अपघात; मालगाडी रुळावरून घसरली, VIDEO

Maharashtra Live News Update : बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैंनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विध्यार्थीना विषबाधा

Akkalkuwa News : मृत्यूनंतरही मरण यातना संपेना; पुराच्या पाण्यातून काढावी लागते अंत्ययात्रा

Jasprit Bumrah : लॉर्ड्सवर जसप्रीत बुमराहचा जलवा, शतकवीर रूटसह कॅप्टन स्टोक्सही चक्रावला; इंग्लंडच्या अडचणी वाढल्या

Astro Tips For Car: नवीन गाडीची पूजा बायकोकडून का करावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार फायदे

SCROLL FOR NEXT