Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : कोल्हापूरच्या विजयासाठी लाखांच्या पैजा; वाढलेल्या टक्क्यानं वाढवली उत्सुकता

Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील लढतींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. तर आता मतदानानंतरही गावागावातील गल्ली, चौक, पार आणि चावडीवर कोण बाजी मारणार? याचीच चर्चा रंगलीय.

Sandeep Gawade

भरत मोहळकर

कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील लढतींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. तर आता मतदानानंतरही गावागावातील गल्ली, चौक, पार आणि चावडीवर कोण बाजी मारणार? याचीच चर्चा रंगलीय. पण ही फक्त चर्चाच नाही तर कार्यकर्त्यांमधील इर्षा आणि उमेदवारांप्रती असलेली निष्ठा यामुळे पाचशे रुपयांपासून लाखांच्या पैंजा लागल्या आहेत. त्यामुळे राज्यभर कोल्हापूर जिल्हा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय.

कोल्हापूर निवडणुकीच्या मैदानात स्वत: शाहू महाराज छत्रपती उतरल्यामुळे सा-या राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलंय. गादीचा मान आणि कोल्हापुरात वाढलेला मतदानाच्या टक्क्यामुळे आता थेट विजयाबाबत लाखांच्या पैजा लावल्या जात आहेत. कोल्हापूरसह हातकणंगलेमध्येही तिरंगी लढत रंगल्यामुळे इथंही पैजांना ऊत आलाय. हातकणंगलेत महायुतीचे धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील अशी तिरंगी लढत पहायला मिळाली.

कोल्हापूर जिल्हा आपल्या रांगडेपणासाठी प्रसिद्ध आहे. त्यानुसारच आताही हौशी कार्यकर्त्यांनी पैंजा लावल्या आहेत. पण राजकीय आखाड्यात कोण चितपट होणार आणि कोण मैदान मारणार? हे 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या वनविहार कॉलनी परिसरात आणखी एक बिबट्या

Chanakya Niti: तुमच्या चांगुलपणाचा फायदा तर घेत नाहीत ना? चाणक्यांनी सांगितली माणसं ओळखण्याची ट्रिक

Maharashtra Politics: पुन्हा काका-पुतण्यात दुरावा! बिहार निवडणुकीच्या धामधुमीत भाजपनं खेळला डाव, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

Bihar Election Result Live Updates : बिहारमधील विजयाचा अकोला भाजपकडून जल्लोष

Kalyan Dombivli : कल्याण-डोंबिवलीचा विकास झटपट होणार; खटाखट मिळणार बांधकाम परवानग्या, नेमकी यंत्रणा काय?

SCROLL FOR NEXT