Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

Lok Sabha Election 2024 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याची नेहमी काळजी घेतात. त्यामुळेच उद्धव ठाकरे आजारी असताना नरेंद्र मोदींनी फोन करून त्यांची विचारपूस केली होती, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Sandeep Gawade

राजकारणात पक्ष वेगवेगळे असू शकतात मात्र अडचणीच्या काळात आजारपणाच्या काळात विचारपूस करणे मदत करणे ही आपली संस्कृती आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याची नेहमी काळजी घेतात. त्यामुळेच उद्धव ठाकरे आजारी असताना नरेंद्र मोदींनी फोन करून त्यांची विचारपूस केली होती, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महायुतीचे कोल्हापूरमधील उमेदवार संजय मंडलीक यांच्या प्रचार्थ कोल्हापूरमधील चंदगडमध्ये सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याच्या निर्धार केला आहे. त्यामुळे संजय मंडलिक यांना खासदार बनवण्याचं नागरिकांनी ठरवलं आहे. देशासमोर नाही तर विरोधकांसमोर नरेंद्र मोदी संकट आहेत. अजित पवार आमच्या सोबत आहेत. त्यामुळे नक्कीच शरद पवार यांच्यासमोर नरेंद्र मोदी यांचं संकट आहे. जनता याचं उत्तर मतपेटीतून देईल.

संभाजीराजे यांचा राज्यसभेच्या निवडणुकी वेळी अवमान केला. भाजीराजे यांना अटी आणि नियम घालून लिहून घेणे हे चुकीचे. एकीकडे छत्रपती घराण्याचा सन्मान दाखवायचा आणि दुसरीकडे असे लिहून घेणे हे चुकीचं असल्याची टीका त्यांनी केली.

ही निवडणूक महत्वाची आहे. पुढील 5 वर्षे देश कोणाच्या हातात सुरक्षित राहणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे. पर्याय 2 आहेत 1 मोदी जी आहे, वेगवेगळे पक्ष एकत्र करून आपण महायुती केली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या कडे 26 पक्षाचे खिचडी आहे. मोदी यांची विकासाची गाडी आहे तर राहुल गांधी यांच्याकडे इंजिन आहे पण डब्बे नाही आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मातोश्रीवर बड्या नेत्यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

Crime: बाप बनला हैवान! झोपलेल्या मुलीच्या गळ्यावरून ब्लेड फिरवलं, नंतर बायकोवर चाकू हल्ला; मुंबई हादरली

Maharashtra Live News Update : शितल तेजवानी पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती समोर

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट! महापालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचा 'वेगळा' निर्णय

SCROLL FOR NEXT