Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : माढ्यात भाजपचा बी प्लान तयार; २५ वर्षांपासूनचे कट्टर विरोधक येणार एकत्र

Lok Sabha Election 2024 : माढ्यात बी प्लॅन तयार केला आहे. गेल्या 25 वर्षांपासून कट्टर राजकीय विरोधक असलेले माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत हे एकत्र येणार आहेत.

Sandeep Gawade

माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घोडामोडींना वेग आला आहे. माळशिरस तालुक्यातील कट्टर विरोधक असलेले मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांना एकत्रित आणण्याची किमया शरद पवार यांनी साधली. त्यानंतर त्यांच्या या रणनितीला शह देण्यासाठी भाजपानेही माढ्यात बी प्लॅन तयार केला आहे. गेल्या 25 वर्षांपासून कट्टर राजकीय विरोधक असलेले माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत हे एकत्र येऊन भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करणार आहेत.

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून तुतारी हाती घेतली आहे. यानंतर माळशिरसचे धनगर समाजाचे नेते व मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक उत्तमराव जानकर यांनी ही मोहिते पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला आहे. या घडामोडीमुळे माढ्यात महाविकास आघाडीचे पारडे जड झाले आहे. त्यानंतर लगेचच भाजपानेही महाविकास आघाडीला शह देण्यासाठी बी प्लॅन तयार केला आहे.

याचाच एक भाग म्हणून माढ्यातील कट्टर विरोधक बबन शिंदे आणि शिवाजी सावंत हे एकत्र येणार आहेत. शिंदे- सावंत यांच्या एकत्र येण्यामुळे भाजप उमेदवाराला याचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. यावर आता महाविकास आघाडीचे नेते कसा डाव टाकतात हे पहावं लागणार आहे. या संदर्भात शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांना विचारले असता त्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: सरकारच्या तिजोरीवर लोकप्रिय योजनांचा ताण; महाराष्ट्राच्या डोक्यावर ९ लाख कोटींचं कर्ज

Maharashtra Live News Update: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अंधेरी स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड

Famous Actress Death : हरहुन्नरी अभिनेता काळाच्या पडद्याआड; झोपेतच झाला मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

Garlic Chutney Recipe : झणझणीत लसणाची चटणी, जेवणाची वाढवेल चव

DCM Ajit Pawar : 'तिकीट देताना जातीपाती...'; आगामी निवडणुकांवर अजित पवारांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT