Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

J. P. Nadda/RSS : लोकसभा निवडणुकीचे देशात अजून तीन टप्पे बाकी आहेत. मात्र त्यापूर्वीच भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आधी आरएसएसची गरज होती. मात्र आता भाजप स्वत: सक्षम असल्याचं विधान करून खळबळ उडवून दिलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचे देशात अजून तीन टप्पे बाकी आहेत. मात्र त्यापूर्वीच भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आधी आरएसएसची गरज होती. मात्र आता भाजप स्वत: सक्षम असल्याचं विधान करून खळबळ उडवून दिलीय. यामुळे मात्र भाजपवर सारवासारव करण्याची वेळ आली असून विरोधकांनाही आयतं कोलीत मिळालंय. यावरचा हा रिपोर्ट.

भाजपची मातृसंघटना अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची ओळख आहे. संघाच्या मुशीतून तयार झालेले अनेक स्वयंसेवक पुढे भाजपच्या माध्यमातून सक्रीय राजकारणात जातात. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा अनेक वर्षं संघाचे प्रचारक म्हणूनच काम करत केलंय. त्यांच्यासारख्या अनेक मोठ्या नेत्यांचं मूळ हे संघात आहे. मात्र आता भाजपला संघाची गरज राहिलेले नसल्याचं दिसतंय. कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत तसा थेट दावाच केलाय. यामुळे अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत....नड्डा नेमकं काय म्हटले आहेत ते पाहूयात.

सुरुवातीला आमची क्षमता कमी होती, तेव्हा आरएसएसची गरज होती. आता आमचा विस्तार झालाय. पूर्वीपेक्षा आम्ही आता अधिक सक्षम आहोत. भाजप आता स्वत:च स्वत:ला चालवू शकतो. नड्डा यांच्या या विधानामुळे विरोधकांना आयतं कोलित मिळालंय. उद्धव ठाकरेंनी तर भाजप संघालाच संपवायला निघाल्याचा आरोप केलाय. त्यामुळे भाजपवर सारवासारव करण्याची वेळ आलीय.

भाजप ही केडरबेस पार्टी आहे, कारण राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या कार्यकर्त्यांची तगडी फळी त्यांच्यासाठी पडद्यामागून काम करत असते. आणि निवडणुकीच्या काळात तर हेच संघटनात्मक जाळं भाजपच्या पाठीशी असतं. असं असताना नड्डांनी अजून तीन टप्प्यांचं मतदान बाकी असताना भाजपला संघाची गरज नसल्याचं वक्तव्य केलंय. यामुळे भाजप आणि संघात सारंकाही आलबेल नसल्याची चर्चा रंगू लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड; तीन आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

Maharashtra News Live Update: वसई-विरारमधील तलावांमध्ये पडून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमुळे आंदोलन

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारू विक्रीबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT