Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : ...तर आम्ही मदत केली असती; हिना गावित यांच्या भेटनंतरही शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांची नाराजी कायम

Sandeep Gawade

भाजपच्या उमेदवार हिना गावित यांनी भेट घेतल्यानंतर देखील संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांची नाराजी कायम आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. हिना गावित यांनी आमच्याशी आधी संपर्क केला असता तर आम्ही मदत केली असती असं सूचक विधान रघुवंशी यांनी केलं आहे.

रघुवंशी यांची मदत महायुतीला होणार नाही त्यामुळे याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवार गोवाल पाडवी यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील वाद कधी मिटणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाचा वाद केल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागणार असल्याचं चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटलं आहे.

खासदार हिना गावित यांच्याकडे दहा वर्षाच्या राजकारणाच्या अनुभव आहे. तर काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. मात्र गोवाल पाडवी यांचे वडील के. सी. पाडवी गेल्या ३० वर्षापासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यामुळे हिना गावित यांना गोवाल पाडवी कशा पद्धतीने आव्हान देणार हे पाहणं आता महत्त्वाच्या ठरणार आहे.

नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र गेल्या दहा वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे स्व राहिले आहे. त्यामुळे खासदार हिना गावित या गेल्या दहा वर्षापासून नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार आहेत. यावेळी हिना गावित यांच्या विरोधात काँग्रेसचे नवीन उमेदवार गोवाल पाडवी यांचा आमना सामना पाहण्यास मिळणार आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Rain News | कोल्हापुरात अवकाळी पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी झाडं कोसळली

Maharashtra Lok Sabha Voting Live: मुंब्रातील अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा, उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

Rinku Rajguru: रिंकूच्या निरागस अदा; लूकपेक्षा चाहत्याच्या खास कमेंटचीच चर्चा

Yami Gautam Welcome Baby Boy : यामी गौतमने दिला गोंडस मुलाला जन्म, फोटो शेअर करत सांगितलं नाव

Pune अपघात प्रकरणी Ravindra Dhangekar यांचं पुण्यात आंदोलन, केली मोठी मागणी

SCROLL FOR NEXT