लोकसभा २०२४

Maharashtra Loksabha: वंचितचा काँग्रेसला परत 'दे धक्का'; रामटेकमधील बंडखोर उमेदवाराला पाठिंबा

Maharashtra Loksabha Election : रामटेकमधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शंकर चहांदे यांनी माघार घेत अपक्ष उमेदवाराला पाठिबा दिलाय. किशोर गजभिये हे काँग्रेसचे बंडखोर नेते आहेत. ते मागील वेळी काँग्रेसमधून निवडणूक लढले होते.

Bharat Jadhav

(पराग ढोबळे, नागपूर)

Maharashtra Loksabha Election Vanchit Bahujan Aaghadi:

वंचित बहुजन आघाडीने कांग्रेसला परत एक धक्का दिलाय. रामटेकमध्ये काँग्रेसमधील बंड करून अपक्ष उभा राहिलेल्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिल्याने काँग्रेस आणि वंचितमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीसोबत जागावाटपावरून बोलणी फिसटकल्यानंतर वंचितने आपले उमेदवारांची यादी जाहीर केली. (Latest News)

रामटेक लोकसभेमधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शंकर चहांदे यांनी तांत्रिक कारणामुळे माघार घेतल्याचे जाहीर करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर केले आहे. वंचितचे प्रमुख डॉ.प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय.

वंचित स्वबळावर निवडणूक लढवण्याने महाविकास आघाडीच्या मतावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या हट्टामुळे आघाडीची बोलणी फिसकटली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून केला जातोय. आघाडीसोबत चर्चेची घडी विस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते.आता या वादाचा दुसरा भाग सुरू झालाय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रामटेकमधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शंकर चहांदे यांनी माघार घेत अपक्ष उमेदवाराला पाठिबा दिलाय. किशोर गजभिये हे काँग्रेसचे बंडखोर नेते आहेत. ते मागील वेळी काँग्रेसमधून निवडणूक लढले होते. यावेळी त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी बंडखोरी करत नामांकन अर्ज भरला. शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज भरतांना किशोर गजभिये यांनी वंचितचा एबी फॉर्म जोडला होता. आता वंचितने गजभिये यांना पाठिबा दर्शवलाय.

शंकर चहांदे होते वंचितचे उमेदवार होते. एका दिवसाअगोदर शंकर चहांदे यांनी सुद्धा वंचितच्या एबी फॉर्मसोबत नामांकन अर्ज दाखल केला होता. आता त्यांनी त्यांचा पाठिंबा काँग्रेसचे बंडखोर नेते किशोर गजभिये यांना दिल्याने काँग्रेसच्या उमेदवाराच्या अडचणीत वाढ झालीय. रश्मी बर्वेचा उमेदवारी रद्द झाल्यानं पती श्यामकुमार बर्वे हे अधिकृत उमेदवार असणार आहेत. मात्र मत विभाजनाचा फटका कॉंग्रेस आणि शिंदे सेनेला बसणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे रामटेकचे उमेदवार शंकर चहांदे यांनी पत्रकार परिषदेत माघार घेतल्याचं सांगितलं. किशोर गजभिये अपक्ष उमेदवार असल्यामुळे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. कारण की भाजपसोबत लढण्यामध्ये व मतांचे विभाजन होऊ नये म्हणून चहांदे यांनी माघार घेत किशोर गजभिये यांना पाठिंबा दिला.

शंकर चहांदे तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकमताने रामटेक लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारार्थ उपस्थित राहून पूर्ण ताकतीने निवडून आणण्याचा प्रयत्न करतील, असे अनिल अण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT