Loksabha Election 2024: Samtv
लोकसभा २०२४

Dilip Walse Patil: 'आरोप प्रत्यारोप, भावनिक आवाहन लोकशाहीला शोभणारं नाही', दिलीप वळसे पाटलांचा राज्यकर्त्यांना टोला

Loksabha Election 2024: सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना त्यांनी प्रकृतीच्या कारणामुळे संपूर्ण प्रचार प्रक्रियेपासून लांब राहावे लागल्याबद्दल खंत व्यक्त केली.

रोहिदास गाडगे

पुणे, ता. १३ मे २०२४

राज्यात लोकसभेच्या ११ मतदार संघांसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळपासूनच नागरिक, राजकीय मंडळी, कलाकार, मतदान केंद्रांवर हजेरी लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना त्यांनी प्रकृतीच्या कारणामुळे संपूर्ण प्रचार प्रक्रियेपासून लांब राहावे लागल्याबद्दल खंत व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री दिलीप वळसे पाटील हे घरात पाय घसरुन पडल्याने रुग्णालयात दाखल झाले. पायाला दुखापत झाल्याने वळसे पाटील यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला त्यामुळे संपूर्ण प्रचारापासून ते लांब होते. आज त्यांनी शिरुरच्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावात मतदान केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रचार सभेत झालेल्या आरोप प्रत्यारोपांवरुन राज्यकर्त्यांना टोला लगावला.

"लोकसभा निवडणूकीत राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा व्हायला हवी होती. मात्र दुदैवाने मोठ्या नेत्यांपासुन ते लहान नेत्यांपर्यत सर्वांनी राष्ट्रीय प्रश्न बाजुला ठेवुन एकमेकांवर वैयक्तिक आरोप आणि भावनिक आवाहन केले. हे सर्व लोकशाहीला शोभणारे नाही," असे म्हणत दिलीप वळसे पाटलांनी केंद्रासह राज्यातल्या नेत्यांना शेलक्या शब्दात चिमटा काढला.

शिरुर लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा मतदान करणा-या तरुणाईची संख्या लक्षणीय असुन देशाच्या निवडणूकीत तरुणाईला शरद पवारांची भुरळ पडल्याचे दिसत आहे. शरद पवारांनी उभारलेले प्रकल्प,रोजगारनिर्मिती शिक्षणाचे उभे केलेले सक्षम पर्यायामुळे तरुणाईला शरद पवारांची भुरळ पडली असून अनेक युवा मतदारांनी तुतारीला पसंती दर्शवल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT