Maharashtra Lok Sabha Election  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : ना शरद पवार गट, ना ठाकरे गट, ना काँग्रेस... लोकसभा निवडणुकीसाठी वसंत मोरेंचं ठरलं!

Lok Sabha Election 2024 : मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांना पक्षातून बाहेर पडून आता १० दिवस उलटले आहे. वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं ते वारंवार सांगत आहेत. त्यांच्या या निर्णयावर ते आजही ठाम आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांना पक्षातून बाहेर पडून आता १० दिवस उलटले आहे. या दरम्यान वसंत मोरे यांनी काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले. वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं ते वारंवार सांगत आहेत. त्यांच्या या निर्णयावर ते आजही ठाम आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विद्यामान आमदार रविंद्र धंगेकर रिंगणात उतरु शकतात. त्यामुळे वसंत मोरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणे कठीण आहे. मात्र वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, कुठल्या पक्षात जाण्यासाठी मी मनसे सोडलेली नाही. मी सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो आहे. त्यानंतर मी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपने पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बोलताना पुण्यातील निवडणूक एकतर्फी होईल असा दावा, मोहोळ यांनी केला. या दाव्याचा देखील वसंत मोरे यांनी समाचार घेतला. वसंत मोरे जोपर्यंत आहे तोपर्यंत पुण्यातील निवडणूक एकतर्फी होणार नाही.

बातमी अपडेट होत आहे...

मी एकला चलो रेच्या भूमिकेत आहे. मी अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मध्यंतरीच्या काळात मी शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या. पुणे शहरात कशाप्रकारे मोट बांधली जाऊ शकते हे मी सर्वांना समजावून सांगितलं. मात्र यावेळी मी निवडणूक लढवणारचं हे ठरवलं होतं. त्यामुळे आता देखील मी अपक्ष निवडणूक लढण्यास तयार आहे, असं वसंत मोरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flood Relief Help Scam : अकोल्यात शेतकऱ्यांची थट्टा! मदत म्हणून ३ ते २१ रुपयांचा चेक, ‘साम टीव्ही’च्या बातमीनंतर सरकारला जाग

Hair Care: केस खूप गळतायेत, कोरडे आणि पांढरे होतायेत? मग हा १ पदार्थ ठरेल बेस्ट, होतील दाट आणि चमकदार केस

Marathi Actress On Rohit Arya Case: अन् मी थोडक्यात वाचले...; रोहित आर्यचा 'या' मराठी अभिनेत्रीला जाळ्यात ओढण्याचा डाव फसला

Amruta Khanvilkar Photos: काय होतीस तू, काय झालीस तू... अभिनेत्री 'चंद्राचा' नवा लूक, हटके स्टाईलमधील फोटोशूट चर्चेत

Paneer Biryani Recipe: रेस्टॉरंटसारखी घरच्या घरी कुकरमध्ये बनवा मऊ अन् झणझणीत पनीर बिर्याणी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT