Maharashtra Lok Sabha Election  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : जगात जर्मनी अन् भारतात परभणी, पण..., उमेदवारी जाहीर होताचं महादेव जानकरांचं विरोधकांवर टीकास्त्र

Lok Sabha Election 2024 : महायुतीतून परभणी लोकसभा मतदारसंघातून रासपचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शनिवारी त्यांच्या उमेदवारीवर अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर त्यांनी आज परभणीच्या विकासावरून विरोधी पक्षांवर निषाणा साधला.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

महायुतीतून परभणी लोकसभा मतदारसंघातून रासपचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शनिवारी त्यांच्या उमेदवारीवर अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर त्यांनी आज परभणीच्या विकासावरून विरोधी पक्षांवर निषाणा साधला. जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी उपमा परभणीसाठी दिली जाते, मात्र मराठवाड्यामध्ये परभणीचाच विकास झालेला नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. नांदेड, छत्रपती संभाजी नगर, लातूर या जिल्ह्यांचा झपाट्याने विकास झाला पण परभणीचा विकास रखडला. त्यामुळे परभणीच्या विकासासाठीच या निवडणुकीत उतरलो आहे, असंही जानकर म्हणाले.

मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीचा विकास केला, शरद पवार यांनी बारामतीचा विकास केला, सोनिया गांधी यांनी रायबरेलचा विकास केला त्याच पद्धतीने मी परभणीचा विकास करणार आहे. अमित शहा यांनी स्वतः दिल्लीमध्ये बोलावून घेतलं. त्यावेळी माझ्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित होते. या सर्वांसमक्ष अमित शहा यांनी सांगितले की आपल्याला महादेव जानकर यांना परभणी लोकसभेची जागा द्यायची आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांनी या परभणी लोकसभा मतदारसंघातून मागील सहा महिन्यापासून तयारी केली होती. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला होता, पण त्यांचा हा त्याग व्यर्थ जाणार नाही, तर येणाऱ्या एक दोन महिन्यातच ते माझ्यासोबत बसतील त्याचबरोबर मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कपबशी चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर

'द लायन किंग'ला Mahavatar Narsimha पछाडणार; रक्षाबंधनला मोडले अनेक रेकॉर्ड, कलेक्शनचा आकडा किती?

...अन् एकनाथ शिंदे सुसाट धावत सुटले; उपमुख्यमंत्र्यांचा मॅरेथॉनचा व्हिडिओ व्हायरल

ITR Filling 2025: पहिल्यांदा आयटीआर भरताय? नो टेन्शन, स्टेप बाय स्टेट प्रोसेस जाणून घ्या, आयकर विभागाने जारी केला व्हिडिओ

Bapu Aandhle Case : सरपंच हत्या प्रकरणाच्या आरोपीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, बीडमध्ये पुन्हा वातावरण तापले

SCROLL FOR NEXT