Maharashtra Exit Polls 2024 Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Exit Polls 2024: महाराष्ट्रात महायुतीचा 45 पारचा नारा हुकणार? एक्झिट पोलनुसार महायुतीला घवघवीत यश नाही

Exit poll results LIVE: एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहे, यामध्ये महायुतीला धक्का बसताना दिसत आहे. राज्यात महायुतीचा 45 पारचा नारा हुकणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Satish Kengar

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातही टप्प्यांचे मतदान संपले आहे. आता सगळ्यांनाच निकालाची उत्सुकता आहे, पण त्याआधी आज एक्झिट पोलचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. यातच राज्यात महायुतीला मोठा धक्का बसताना दिसत आहे. एक्झिट पोलमध्ये महायुतीचा 45 पारचा नारा हुकताना दिसत आहे.

एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला राज्यात 20 ते 23 जागा मिळताना मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा राज्यात घटणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा?

सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपला 17 जागा मिळू शकतात. तर शिवसेना शिंदे गटाला 6 आणि अजित पवार गटाला फक्त 1 जागा मिळू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महविकास आघाडीतील पक्ष उद्धव ठाकरे गटाला 9 जागा, काँग्रेसला 8 आणि शरद पवार गटाला 6 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

चाणक्यनुसार महाराष्ट्रात महायुतीला 33 जागा

चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार, राज्यात महायुतीला 33 जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला फक्त 15 जागा मिळू शकतात, असं सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Tourism : लाल दगड अन् संगमरवरी कला, 'हा' वास्तुकलेचा अद्भुत नजारा पाहून तुमचे डोळे दिपतील

Ladki Bahin Yojana: पात्र आहात, ईकेवायसीही केली, पण हप्ता बंद; ₹१५०० मिळवण्यासाठी लाडक्या बहि‍णींनी काय करायचं?

Kelyacha Sheera Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा मऊसूद आणि चविष्ट केळ्याचा शिरा

Ranbir Kapoor -Ramayana : भारतीय चित्रपटाचा जगभरात बोलबाला, 'या' कारणांमुळे खास आहे रणबीर कपूरचा 'रामायण'

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT