अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, सोलापूर
सोलापूर : धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश करत भाजपला मोठा धक्का दिलाय. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहितेंचा पक्षप्रवेश झालाय. तर 16 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करून धैर्यशील पाटील रणजितसिंह निंबाळकरांविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. धैर्यशील मोहितेंच्या पक्षप्रवेशाआधी अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील या दिग्गज नेत्यांची बैठक झाली.. बैठकीनंतर भाजपसह शिंदे गटाला दुहेरी धक्का देण्याचा पवारांचा मास्टरप्लॅन आहे.(Latest News)
येत्या 23 एप्रिलला अकलूजच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तर 26 एप्रिलला माजी आमदार नारायण आबा पाटील शिंदे गटाची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. विजयसिंह मोहिते पाटलांच्या या निर्णयाचे पडसाद राज्यभर उमटतील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय. मात्र मोहितेंच्या घरवापसीमुळे शरद पवार गटातही धुसफूस सुरु झालीय. अभयसिंह जगताप यांनी नाराजीतून अपक्ष लढण्याचे संकेत दिलेत. यानंतर जयंत पाटील यांनी तातडीने अभयसिंह जगतापांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय. दुसरीकडे मोहिते-पाटलांच्या जाण्यामुळे माढ्यात होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल सुरु केल्याची माहिती समोर आलीय.
उत्तम जानकर भाजपसाठी महत्त्वाचे का?
मोहिते-पाटील यांच्यासोबत उत्तम जानकर हेदेखील तुतारी हाती धरतील असे संकेत आहेत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागून सूत्रे हलवत उत्तम जानकर यांना सागर बंगल्यावर बोलावून घेतलंय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळशिरस मतदारसंघातून राम सातपुते यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत उत्तम जानकर अवघ्या 2000 मतांनी पडले होते. सोलापूर आणि माढ्यात उत्तम जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
हीच गोष्ट लक्षात घेऊन आता देवेंद्र फडणवीस यांनी आता उत्तम जानकर यांना भाजपच्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.माढ्याचं मैदान मारणं आता रणजितसिंह निंबाळकरांसाठी सोप्प राहिलेलं नाही.. माढ्यात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरावच लागणार आहे.. शरद पवारांनी केलेली कोंडी फोडण्यासाठी फडणवीस कोणती खेळी खेळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल..
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.