Nashik Lok Sabha 2024 Saam Tv
लोकसभा २०२४

Nashik Lok Sabha 2024: नाशिक लोकसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांचं दबावतंत्र? ओबीसींची ताकद दाखवण्यासाठी मोठी खेळी

Mhayuti Seat Sharing Issue In Nashik: महायुतीकडून अद्यापही नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महायुतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

Rohini Gudaghe

अभिजीत सोनवणे साम टिव्ही, नाशिक

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. परंतु अजून महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha 2024) उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. छगन भुजबळ यांचं आता महायुतीत दबावतंत्र पाहायला मिळत आहे. समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांचं ओबीसी दबावतंत्र दिसून येत (Mhayuti Seat Sharing Issue In Nashik) आहे.

नाशिक आणि संभाजी नगरमधून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत, तर नाशिक आणि संभाजीनगर अन्य काही ठिकाणी उमेदवार देण्याची समता परिषदेची तयारी अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राज्यातील ओबीसींची ताकत दाखवण्यासाठी भुजबळांचे समर्थक लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. नाशिकमधून दिलीप खैरे तर संभाजीनगरमधून मनोज घोडके यांनी उमेदवारी अर्ज घेतले (Lok Sabha 2024) आहेत. ज्या भुजबळांनी आजवर अनेकांना उमेदवाऱ्या दिल्या, त्या भुजबळ यांना ताटकळत ठेवल्याने आम्ही आता ओबीसी ताकत दाखवणार असल्याचं समर्थक म्हणत आहेत. भुजबळ समर्थकांकडून आता दबावतंत्र वापरलं जात असल्याचं दिसून येत आहे.

नाशिक लोकसभेच्या उमेदवारासाठी आता मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे मैदानात उतरल्याची माहिती (Mhayuti Seat Sharing) मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांनी नाशिकच्या जागेवर लवकर उमेदवार विनंती केली आहे. नाशिकच्या जागेसंदर्भात मुंबईत एकनाथ शिंदे यांची गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी भेट घेतल्याची माहिती (Maharashtra Election) मिळत आहे.

महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करून एक महिना झाला, तरी अद्याप महायुतीकडून उमेदवार कोण यावर निर्णय झाला (Maharashtra Politics) नाही. त्यामुळे महायुतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने नाशिक लोकसभेसाठी उमेदवार (Mhayuti) लवकर जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे यांना येत्या दोन दिवसांत उमेदवार जाहीर करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

SCROLL FOR NEXT