लोकसभा २०२४

Maharashatra Election : माढाचा तिढा अखेर सुटला; महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला, धैर्यशील मोहिते आखाड्यात

Dhairyashil Mohite Patil : जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते यांनी केला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जयंत पाटील यांनी विजयसिंह मोहिते यांच्या गळ्यात पक्षाचं उपरणे घालतं त्यांचं स्वागत केलं.

Bharat Jadhav

Dhairyashil Mohite Patil joins Sharad Pawar Group:

महाविकास आघाडीचा माढाचा तिढा शरद पवार यांनी सोडवलाय. धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. मोहिते पाटील यांची अधिकृत उमेदवारी घोषित करत हा तिढा सोडवलाय. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते यांनी केला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जयंत पाटील यांनी विजयसिंह मोहिते यांच्या गळ्यात पक्षाचं उपरणे घालतं त्यांचं स्वागत केलं.

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात तुमचे स्वागत असल्याचं म्हणत मोहिते पाटील हे माढातील अधिकृत उमेदवार असतील असं जाहीर केलं. धैर्यशील मोहिते पाटील १६ तारखेला प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भापच्या नेते पदाचा राजीनामा देत शरद पवार गटात प्रवेश केला. एक दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार भाग) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र भाजपला रामराम ठोकण्यामागे वैयक्तिक कारणे दिली आहेत. धैर्यशील यांनी भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीसपद भुषवले आहे. माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुखपदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ...यार ने ही लूट लिया घर यार का, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना असं का म्हणाले?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून सव्वा लाख महिलांचे अर्ज बाद; तुमचं नाव तर नाही ना? अशा पद्धतीने करा चेक

Maharashtra Live News Update: फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणी ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ

Crime News: दुचाकीवरून गावाबाहेर नेलं; ड्रिंक्समध्ये टॅबलेट दिले, सहा जणांचा मुलीवर सामूहिक बलात्कार

Gokarna Beach : स्वर्गाहून सुंदर ठिकाणी पार्टनरसोबत जायचंय? मग गोकर्ण बीच ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT