Dhairyashil Mohite Patil Vs Ranjitsinh Naik Nimbalkar: Saamtv
लोकसभा २०२४

Madha Loksabha: माढ्यात नवा तिढा! धैर्यशिल मोहितेंच्या उमेदवारी अर्जावर रणजितसिंह निंबाळकरांचा आक्षेप; सुनावणीत काय होणार?

Dhairyashil Mohite Patil Vs Ranjitsinh Naik Nimbalkar: माढ्याचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी महाविकास आघाडीचे धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्याने नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर|ता. २० एप्रिल २०२४

राज्याच्या राजकारणात सध्या माढा लोकसभा मतदार संघ सर्वाधिक चर्चत आहे. माढ्यात दररोज नव्या राजकीय घडामोडी अन् कुरघोड्या पाहायला मिळत आहेत. अशातच माढ्याचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी महाविकास आघाडीचे धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्याने नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशिल मोहिते पाटील आणि भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. एकीकडे धैर्यशिल मोहिते पाटील यांना पाठिंबा वाढताना दिसत असतानाच रणजितसिंह निंबाळकर यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्याचे समोर आले आहे.

धैर्यशिल मोहिते पाटील यांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये शेती, व्यवसाय, नोकरीचा तपशील दिला नसल्याचा आक्षेप रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडून मांडण्यात आला आहे. या हरकतीवर आज दुपारीच सुनावणी होणार असून काय निर्णय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

माढ्यात महायुतीची वाट बिकट?

दरम्यान, माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चाणाक्ष खेळी करत उत्तम जानकर यांनाही आपल्या गोटात खेचले आहे. उत्तम जानकर यांच्यासह फलटणचे रामराजे नाईक निंबाळकरही महायुतीच्या विरोधात काम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे माढ्यातून महायुतीची वाट बिकट होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अपघातापूर्वी अजितदादांना शेवटचा कॉल कोणी आणि कशासाठी केला? नवी माहिती आली समोर

Maharashtra Live News Update: शिवजयंतीनिमित्त अलिबागमध्ये मिरवणूक, शिवरायांच्या जयजयकारात दुमदुमला परिसर

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

SCROLL FOR NEXT