Sharad Pawar Speech Dahiwadi Sabha: Saamtv
लोकसभा २०२४

Sharad Pawar Speech: असत्य बोलणं मोदी साहेबांचे वैशिष्ट्य... माढ्यातून शरद पवारांचा प्रहार; केंद्र सरकारवर टीकास्त्र

Madha Loksabha News: सभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना मोहिते पाटील यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन केले.

भारत नागणे

अकलूज|ता. ४ मे २०२४

माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा आज अकलूजमध्ये पार पडत आहे. या सभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना मोहिते पाटील यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन केले.

काय म्हणाले शरद पवार?

"आज अनेकजण वयाचा मुद्दा उपस्थित करतात. लोकशाहीमध्ये काम करण्याची हिंमत पाहिजे. उदाहरण द्यायचे झाल्यास मी वयाच्या 26 वर्षी विधानसभेत निवडून गेलो. वयाच्या २७ व्या वर्षी मंत्रिमंडळात होतो त्यानंतर 37 व्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो," असे म्हणत शरद पवार यांनी पुन्हा एकदा वयाच्या मुद्द्यावरुन घेरणाऱ्या विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.

"पंतप्रधान हा देशाचा असतो. आम्ही संरक्षण मंत्री असताना कारखाने काढले. ते फक्त महाराष्ट्रात नाही तर विविध राज्यात काढले. त्याठिकाणच्या मुलांना हाताला काम दिले. मात्र आज महाराष्ट्रात कोणताही प्रकल्प आला की गुजरातला जातो. अशी भूमिका देशाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला शोभत नाही," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

"असत्य बोलणं हे मोदी साहेबांचं वैशिष्ट्य आहे. आज प्रधानमंत्री कुठेही गेले तरी राहुल गांधींवर टीका करतात. त्यांनी तुमचं काय घोडं मारलयं. आज एक तरुण कन्याकुमारीपासून यात्रा काढतो. लोकांचे समजून घेतो. मात्र पंतप्रधान त्यांच्यावर टीका करतात. त्यासोबत नेहरुंवरही टीका करतात. नेहरु आज हयात नाहीत, आज कशासाठी त्यांना शिवीगाळ करायची? त्यांच्यावर कशासाठी टीका करायची?" असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT