Madha Lok Sabha
Madha Lok Sabha Saam Digital
लोकसभा २०२४

Madha Lok Sabha : ३० वर्षांनंतर कट्टर विरोधक जानकर-मोहिते पाटील एकाच व्यासपीठावर; माढ्यात महायुतीला मोठा धक्का

Sandeep Gawade

माळशिरस तालुक्याच्या राजकारणात गेले 30 वर्षे कट्टर विरोधक ओळखले जाणारे उत्तम जानकर आणि मोहिते पाटील आज एकाच व्यासपीठावर आले होते. जानकर - मोहिते पाटील एकत्र आल्याने माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. उत्तम जानकर हे माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे नेते आहेत.

मोहिते पाटील विरोधक म्हणून ते गेल्या 30 वर्षांपासून माळशिरस च्या राजकारणात सक्रिय आहेत. जानकर यांनी तीन वेळा मोहिते पाटील विरोधक म्हणून माळशिरस विधानसभेची निवडणूक लढवली.पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणुकांमध्येही मोहिते पाटील विरोधक म्हणून जानकर यांनी भूमिका बजावली आहे. दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातीतून भाजपने धैर्यशील मोहिते पाटील यांना तर उत्तम जानकर यांना सोलापुरातून उमेदवारी नाकारल्याने दोघेही भाजपमध्ये नाराज होते.

यातूनच मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर मोहिते पाटील विरोधक उत्तम जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मोहिते पाटील यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. गेल्या 30 वर्षाच राजकीय गैर संपून तमोहिते पाटील व जानकर एकाच व्यासपीठावर आल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मी अजित पवार गटात, मात्र राग भाजपवर

जानकर - मोहिते पाटील यांना एकत्र येऊन न देण्याचा भाजपचा प्लॅन होता. सहा महिन्यांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोबत तिकीट मागण्याचा प्लॅन ठरला होता.आम्ही दोघांनी ही तिकीट मागण्याचं ठरलं होतं. धैर्यशील मोहिते पाटील यांना तीन लाख मतांनी निवडून आणू. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धैर्यशील तुरुंगात गेले तरी त्यांना निवडून आणू, असा विश्वास उत्तम जानकर यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime : भंगार चोरल्याने बेदम मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; कल्याण बसस्थानक परिसरातील घटना

Today's Marathi News Live : अकोल्यात बहुचर्चित हत्याकांडात एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळ्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

Married Before 30 Years : तिशीच्या आत लग्न न केल्यास येतील 'या' अडचणी

SCROLL FOR NEXT