Amvarati Loksabha Election: Saam Digital
लोकसभा २०२४

Amravati Loksabha: मतटक्क्याला झळ! अमरावती लोकसभेत ६.६७ लाख मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ

Amvarati Loksabha Election: अमरावती लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी झालेल्या या महाउत्सवात जिल्ह्यातील ६,६६,९५७ मतदारांनी पाठ दाखविल्याचे वास्तव समोर आलं आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. २९ एप्रिल २०२४

अमरावती लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी झालेल्या या महाउत्सवात जिल्ह्यातील ६,६६,९५७ मतदारांनी पाठ दाखविल्याचे वास्तव समोर आले आहे. यामध्ये शहरी मतदारांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मतदानाच्या या घटत्या टक्क्यांवर चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान महत्त्वाचे आहे. किंबहुना है राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे मानल्या जाते. मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी झालेल्या या महाउत्सवात जिल्ह्यातील ६,६६,९५७ मतदारांनी पाठ दाखविल्याचे वास्तव समोर आलं आहे.यामध्ये शहरी मतदारांचे प्रमाण जास्त आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात १८,३६६,०७८ मतदार आहेत. मतदार यादीच्या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये यावेळी मतदारयादी अचूक करण्यात आल्याने यादीतील अनावश्यक फुगवटा कमी झाला. त्यामुळे टक्केवारीचे प्रमाण वाढेल, असे निवडणूक यंत्रणेत बोलल्या जात होते. त्यानुसार ६३.६७ टक्के मतदान झाले. शिवाय, सकाळचे ढगाळ वातावरण व मतदारांमध्ये उत्साह तसेच ग्रामीणमधील दर्यापूर, अचलपूर व मेळघाट मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत झालेले मतदान, यामुळे तीन दशकांत पहिल्यांदा उच्चांकी मतदान झाले आहे.

मात्र शहरी भागात राहणाऱ्या व स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या मतदारांचा टक्का मतदानात कमी झालेला आहे. मतदानाच्या दिवशी शासकीय सुटी व नंतर सलग दोन दिवस सुट्या आल्याने अनेक मतदारांनी मतदानाला खो देत टूरला प्राधान्य दिल्याचेही वास्तव नाकारता येत नाही. यावेळी अनुसूचित जाती, आदिवासी बांधव व मुस्लिमबहुल भागात मतदानाचा टक्का वाढला. त्या तुलनेत अन्य भागांत मात्र मतदान कमी झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : ओबीसी आरक्षण बचावासाठी टोकाचे पाऊल; बीड जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Maharashtra winter : गरम कपडे तयार ठेवा! यंदा महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी, तज्ज्ञांनी सांगितलं कारण, वाचा सविस्तर

Health facts: उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघेदुखीचा त्रास होतो? वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य काय, वाचा!

Rented House : रेंटवर राहणाऱ्यांच्या कामाची बातमी, जाणून घ्या तुमचे हक्क आणि कायदेशीर नियम

आई अन् मुलानं १३ व्या मजल्यावरून उडी मारली; पती झोपलेला असताना आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमधून माहिती उघड

SCROLL FOR NEXT