Yogi Adityanath SAAM TV
लोकसभा २०२४

Loksabha Election : हिंदू अन् उत्तर भारतीय मतांसाठी भाजपचं राज्यात 'योगी कार्ड'; प्रत्येक टप्प्यात सभांचा धडाका

Yogi Adityanath Sabha: हिंदू तसेच उत्तर भारतीय मदतारांसाठी भाजपने योगीकार्ड वापरण्याची रणनिती आखली असून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा घेण्यात येणार आहेत

Gangappa Pujari

सुरज मासुरकर, मुंबई|ता. ११ एप्रिल २०२४

Maharashtra Loksabha Election 2024:

राज्यात सध्या लोकसभेचा धुरळा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा देत भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यभरात सध्या पंतप्रधान मोदींसह भाजप नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. अशातच आता हिंदू तसेच उत्तर भारतीय मदतारांसाठी भाजपने योगीकार्ड वापरण्याची रणनिती आखली असून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा घेण्यात येणार आहेत. (Maharashtra Loksabha Election)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंदू आणि उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून (BJP) राज्यात योगी कार्ड वापरण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यासह मुंबईत योगी आदित्यनाथ यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.

पूर्व विदर्भात योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या तीन सभा पुर्ण झाल्या आहेत. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातही योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार आहेत. प्रत्येक टप्प्यामध्ये भाजपकडून योगी आदित्यनाथ यांच्या चार- ते पाच सभा घेण्याचे नियोजन आहे. तसेच मुंबईमध्येही योगींच्या पाच सभा होणार आहेत.

अमित शहा, जे. पी. नड्डाही महाराष्ट्र दौऱ्यावर...

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. जे. पी नड्डा यांची १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडे चार वाजता गोंदिया येथे जाहीर सभा होणार आहे. त्याचबरोबर १४ एप्रिल रोजी भंडारा येथील साकोलीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

SCROLL FOR NEXT