Khaire Vs Danve Saam Tv
लोकसभा २०२४

Khaire Vs Danve: खैरे नेहमीच मला डावलत आले, दानवे शिंदे गटात जाणार? मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये चांगली जुंपली आहे. त्यावरून अंबादास दानवे हे नाराज असल्याने शिंदे गटात जाणार की काय, याची चर्चा सुरू आहे.

Rohini Gudaghe

माधव सावरगावे

Maharashtra Politics News

लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे जोरदार प्रयत्न सुरू (Lok Sabha Election Maharashtra) आहेत. त्यावरून आता प्रमुख नेते असलेल्या दानवे आणि खैरेंमध्ये वाद सुरू झालाय.  (latest politics news)

माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे दोघेही लोकसभेसाठी दंड थोपटून आहेत. त्यामुळं मातोश्रीवरून कोणाच्या उमेदवारीची घोषणा होते, यावरून लोकसभा निवडणुकीत काय घडामोडी होत (Maharashtra Politics) आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मात्र त्यात अंबादास दानवे हे नाराज असल्यामुळे शिंदे गटात जाणार की काय? याची चर्चा सुरू झालीय. मात्र या सर्व चर्चा खोट्या असल्याचं सांगत उद्धव ठाकरें सोबतच राहणार, असं स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिलं आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिंदे सेनेत जाण्याच्या चर्चेला अंबादास दानवे यांनी पुर्नविराम दिला. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून आपण ही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत, त्यामुळं या निवडणुकीत मी इच्छुक असल्याचा पुनरुच्चार (Chandrakant Khaire Vs Ambadas Danve) केला आहे. शिवाय चंद्रकांत खैरे हे मला नेहमीच डावलत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांमधील असलेला वाद निवडणुकीच्या तोंडावर चव्हाट्यावर आला आहे.

अंबादास दानवे यांनी खैरेंवर आरोप केल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी आपला दावा सांगितल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. शिवाय उमेदवारीचा निर्णय मातोश्रीहून (Sambhajinagar News) होईल. दानवे माझे शिष्य आहेत आणि मी त्यांचा गुरु असल्याचं खैरेंनी सांगितलं आहे.

छत्रपती संभाजीनगर हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला (Lok Sabha Election 2024) आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या फुटीनंतर बालेकिल्ल्याची पडझड झाली. मात्र, ही जागा उद्धव सेनेला जर मिळाली तर आपण जिंकून येऊ, असा विश्वास व्यक्त करीत असल्यानं दोघांनीही या जागेवर दावा केलाय. या दाव्यामुळे आता तिकीट कुणाला मिळणार आणि मिळाल्यानंतर कोण नाराज होणार? नाराजीनंतर कुठली वाट (Lok Sabha Election) धरणार, यावर चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये राजकीय भूकंप! दोन बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, भाजपचं कमळ हाती घेण्याच्या तयारीत

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! दोन जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Shocking: पोलिस चौकीसमोर मर्डर; बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या भावाची धारदार शस्त्राने केली हत्या, परिसरात खळबळ

Pune Car Accident : कोरेगाव पार्कात भयानक अपघात, कार वेगात मेट्रोच्या खांबाला धडकली, दोघांचा मृत्यू,थरारक CCTV व्हिडिओ

SCROLL FOR NEXT