Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Lok Sabha Election : ऐन निवडणुकीत मतदान ओळखपत्र आढळली कचऱ्याच्या ढिगाऱ्यात; जालना शहरातील घटनेने खळबळ

Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होण्याआधीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जालन्यातील शेकडो मतदारांची मतदान ओळखपत्र चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आली आहेत.

Sandeep Gawade

चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होण्याआधीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जालण्यात शेकडो मतदारांची मतदान ओळखपत्र चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आली आहेत. शहरातील अंबड रोडवरील काचंनगर येथे ही ही कार्ड आढळून आली आहेत. याची माहितीमिळताच निवडणूक अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मतदान कार्ड ताब्यात घेतली आहेत. पंचनामा करण्यात आला अज्ञात व्यक्तीविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अंबड रोडवरील कांचननगर येथील फोटो स्टुडिओशेजारी तब्बल 176 मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत आढळून आली. नूतन वसाहत भागातील रहिवाशांना परिसरात मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत आढळून आली होती. याबाबत त्यांनी शासनाशी संपर्क साधत जिल्हा निवडणूक विभाग आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दुपारी महसूल कर्मचाऱ्यांनी मतदान ओळखपत्रांचा पंचनामा केला. 

दरम्यान या प्रकरणाचा अधिकाऱ्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. सापडलेल्या ओळखपत्रांची नावे बीएलओमार्फत तपासणीचे काम सुरू करण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मात्र ऐन निवडणुकीत आणि या मतदारसंघातील मतदानापूर्वीच अशास्थितीत मतदान ओळखपत्रं आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

जालन्यातील या घटनेनवरून उद्धव ठाकरे यांनीही निशाना साधला आहे. मतदान ओळखपत्र कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळत आहेत, त्यावरून सध्या देशात काय सुरू आहे याचा अंदाज येतो असा टोला त्यांनी लगावलाय. छत्रपतीसंभाजीनगरमध्ये आज त्यांची सभा झाली यावेळी ते बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

प्रसादाच्या गुंगीतून लैंगिक शोषण; SITच्या चौकशीत अशोक खरातचे भयंकर कारनामे उघड, VIDEO

Iran-Israel War: इराणच्या ४०० किलो युरेनियमवर अमेरिकेचा डोळा, अमेरिकन सैन्याचा मास्टर प्लॅन काय?

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, पाळीव कुत्राही दगावला

ठाकरेंचं मराठीप्रेम निवडणुकीपुरतंच? निवडणुकीनंतर मराठी अस्मितेला तिलांजली, VIDEO

SCROLL FOR NEXT