Ramdas Athawale : शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मी 'आरपीआय'मध्ये घ्यायला तयार; रामदास आठवलेंनी दिली ऑफर

Lok Sabha Election 2024 : अजित पवारांनी शरद पवारांना आणि एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना घेतलं नाही तर मी त्यांना RPI मध्ये घ्यायला तयार आहे, असं आठवलेंनी म्हटलं आहे.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSaam Digital

रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय, आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले कधी त्यांच्या कवितांमुळे तर कधी राजकीय विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आज शिर्डी लोकसभेच्या जागेवरून बोलताना त्यांनी दिलेल्या ऑफरची राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांनी थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाच ऑफर दिली आहे. अजित पवारांनी शरद पवारांना आणि एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना घेतलं नाही तर मी त्यांना RPI मध्ये घ्यायला तयार आहे, ठाकरे पवारांनी इकडे यावं. शरद पवारांनी देशाच्या विकासासाठी निर्णय घ्यावा, असं आठवलेंनी म्हटलं आहे.

शिर्डी लोकसभेची जागा आरपीआय ला मिळावी अशी मागणी होती. मी शिर्डीत हरलो होतो, त्यामुळे शिर्डीत जिंकण्याची इच्छा होती.मात्र ते शक्य झालं नाही.जागा मिळाली नसली तरी माझा पक्ष NDA सोबत राहणार आहे. राज्यात मंत्रिपद आणि इतर महामंडळ मिळावं अशी फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचं ते म्हणाले.

आम्ही 10 वर्षांपासून NDA सोबत. मोदींच्या विकासाचा रथ पुढे चाललाय. काँग्रेसच्या काळात बाबासाहेबांचं स्मारक उभारण्याची मागणी. मात्र काँग्रेसने दुर्लक्ष केलं. इंदू मिलसाठी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. ती जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. तिथे बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभा राहणार आहे.

Ramdas Athawale
Nitin Gadkari : ...तर रगडल्याशिवाय राहणार नाही; नितीन गडकरींनी बीडच्या सभेत कोणाला भरला दम?

संविधानामुळे देश कधीही तुटू शकत नाही. मोदींनी 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. संविधानाला वंदन करून संसदेत प्रवेश केला.संविधान अजिबात बदललं जाणार नाही. या देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात नाही तर विरोधकांचे पक्ष धोक्यात असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.राज्यात आमच्या 40 ते 45 जागा निवडून येतील.मतदानाची टक्केवारी कमी असली तरी आमच्या जागा निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Ramdas Athawale
Navneet Rana: राहुल गांधी यांच्याबद्दल केलं वादग्रस्त वक्तव्य, नवनीत राणा यांच्याविरोधात FIR दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com