Devendra Fadnavis News Saam tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election : धाराशिवमध्ये भाजपला मोठा धक्का; निवडणुकीआधीच ठाकरे गटाचा बडा नेता स्वगृही परतणार

Dharashiv Constituency : पक्षाकडून खूश नसल्यास अनेक जण पक्ष बदलताना दिसत आहेत. अशात आता धाराशिमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीआधीच भाजपमध्ये गेलेले ठाकरे गटाचे बडे नेते पुन्हा स्वगृही परतत आहेत.

Ruchika Jadhav

गिरीश कांबळे

राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशात अनेक नेते उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत. सध्या असलेल्या पक्षावर नाराजी असल्यास अनेक जण पक्ष बदलताना दिसत आहेत. अशात आता धाराशिमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीआधीच भाजपमध्ये गेलेले ठाकरे गटाचे बडे नेते पुन्हा स्वगृही परतत आहेत.

धाराशिवचे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव बापू कांबळे यांचा शिवसेना ठाकरे गटात उद्धव ठाकरेंच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीये. कैलास पाटील यांच्या नेतृत्वात शिवाजीराव कांबळे यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे.

भोकर येथे उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी शिवाजीराव बापू कांबळे यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे. शिवाजीराव बापू कांबळे हे यापूर्वी शिवसेनेकडून २ टर्म खासदार राहिले आहेत. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 10 वर्षे राज्य कार्यकारिणीवर त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर आता ते पुन्हा स्वगृही परतत आहेत.

माढ्यात भाजपला मोठा धक्का

लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर भाजपला माढामधून देखील मोठा धक्का बसला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छूक होते. मात्र भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनी राजीनामा दिला आणि शरद पवार गटाची साथ दिली. त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीकडून माढा लोकसभेच्या रिंगणात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreya-Kushal Video : बाई काय हा प्रकार; श्रेया बुगडे अन् कुशल बद्रिकेने भयानक स्टाइलमध्ये दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

SCROLL FOR NEXT