Lok Sabha Election 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : टीएमसीपेक्षा भाजपलाच मतदान करा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

Adhiranjan Chaudhary On TMC : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. या रणधुमाळीत पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधिररंजन चौधरी चर्चेत आले आहेत.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. या रणधुमाळीत पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधिररंजन चौधरी चर्चेत आले आहेत. तृणमूल काँग्रेसला मतदान करण्यापेक्षा भाजपला मतदान केलेलं बरं, असं विधान त्यांनी केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये अधिर रंजन चौधरी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वादामुळेच इंडिया आघाडी होऊ शकली नाही. त्यामुळे काँग्रेस, भाजप आणि तृणमूल काँग्रेस अशी थेट लढत होत आहे. त्यामुळे आज अधिर रंजन चौधरी यांनी थेट भाजपलाच मतदान करण्याच आवाहन केल्यामुळे देशभर चर्चांना उधान आलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी आहे. त्यामुळे अनेक जागांवर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होत आहे. अधीर रंजन चौधरी यांच्याकडून प्रामुख्याने ममतांना लक्ष्य केले जात आहे. या दोघांमधील वादामुळेच आघाडी झाली नसल्याचीही चर्चा असतानाच आता अधिररंजन चौधरींचं वक्तव्य समोर आलं आहे. जंगीपूरमध्ये झालेल्या एका सभेत, काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा विजय मिळणं अत्यंत आवश्यक आहे. असं झालं नाही तर धर्मनिरपेक्षता धोक्यात येईल. तृणमूल काँग्रेसला मत देण्याचा अर्थ भाजपलाच मत देण्यासारखाच आहे, त्यामुळे त्यापेक्षा तुम्ही भाजपलाच मत द्या, असं आवाहनच त्यांनी केलं.

अधिररंजन चौधरी यांच्या ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सावरून घेत भाजप आणि टीएमसीलाही मत देऊ नका, असं स्पष्ट केलं. मोदी आधी 400 पार चा प्रचार करत होते. पण आधीच ते शंभर जागांवर हरले आहेत. दरम्यान, चौधरी यांच्या या विधानंतर तृणमूल काँग्रेसनेही अधीररंजन चौधरीवर निशाणा साधला. अधीर रंजन चौधरी हे भाजपची बी टीम असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: शाळेमध्ये २ विद्यार्थ्याची आत्महत्या, गळफास घेत संपवलं आयुष्य; पालघर जिल्हा हादरला

Lack of sleep: नीट झोप होत नाही! आरोग्यासाठी ठरतेय सर्वात घातक, संशोधनातून समोर आली झोप उडवणारी माहिती

नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव देण्याच्या भाजपमध्ये हालचाली; राऊतांच्या दाव्यानं खळबळ | VIDEO

Maharashtra Live News Update: पन्हाळगड परिसरात बिबट्याचा अपघाती मृत्यू

'गृहराज्यमंत्र्यांकडून गँगस्टरला शस्त्रपरवाना, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा', शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT