Lok Sabha Election 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या सरचिटणीसांना भाजपसाठी मतं मागणं भोवलं; पक्षाकडून गंभीर दखल, केली मोठी कारवाई

West Bengal Politics 2024 : भाजपच्या उमेदवाराला समर्थन देणारे पश्चिम बंगाल काँग्रेसचे सरचिटणीस बिनॉय तमांग यांना पक्षाने ६ वर्षांसाठी निलंबित केलं आहे. बिनॉय तमांग यांनी भाजपचे उमेदवार राजू बिस्ता यांच्यासाठी मतदान करण्याचं आवाहनही केलं होतं.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडतायेत. याच धामधुमीत पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या उमेदवाराला समर्थन देणारे पश्चिम बंगाल काँग्रेसचे सरचिटणीस बिनॉय तमांग यांना पक्षाने ६ वर्षांसाठी निलंबित केलं आहे. दार्जिलिंग लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मुनीश तमांग आणि भाजपकडून राजू बिस्ता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र बिनॉय तमांग यांनी काँग्रेस उमेदवाराऐवजी भाजपचे उमेदवार राजू बिस्ता यांना समर्थन दिलं, इतकंच नाही तर त्यांनाच मतदान करण्याचं आवाहनही केलं होतं.

दार्जिलिंगचे काँग्रेसचे लोकसभा उमेदवार मुनीश तमांग यांना बिनॉय तमांग विरोध दर्शवला होता. पक्षांच्या वरिष्ठांनी आपल्याला विश्वासत न घेता ही उमेदवारी जाहीर केली होती, असा आरोप बिनॉय तमांग यांनी केला होता, असं वृत्त आजतकने दिलं आहे. राजू बिस्ता यांच्यामुळे दार्जिलिंगच्या पर्वतीय भागातील जनतेला न्याय आणि सुरक्षा मिळेल, असं म्हणत त्यांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.

एकेकाळी गोरखा जनमुक्ती मोर्चाचे नेते आणि बिमल गुरुंगचे अनुयायी असलेले बिनॉय तमांग यांनी २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसमध् प्रवेश केला होता. २०२२ मध्ये त्यांनी तृणमूला सोडचिठ्ठी दिली आणि नोव्हेंबर 2023 मध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत दिल्लीला गेले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ५ महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता पाच महिन्यातच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दार्जिलिंगमध्ये काँग्रेसने मुनीश तमांग यांना उमेदवारी दिली आहे. मुनीश यांनी गोरखा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिनॉय तमांग दार्जिलिंगमधून लोकसभेसा निवडणुकीसाठी इच्छुक होते. तसा प्रस्तावही काँग्रेस हायकमांडकडे पाठवण्यात आला होता. मात्र अखेरच्या क्षणी मुनीश तमांग यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ते आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझी बायको घर सोडून गेली, मी जिवंत राहणार नाही; पाण्याच्या टाकीवर चढून नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Instagram : Instagram वर पॉपुलर होण्यासाठी फॉलो करा या 7 सुपरहिट स्टेप

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये 'तारक मेहता का उलटा चश्मा'मधील 'या' सदस्याची एन्ट्री, कोण आहे ती?

Gk : मोठ्या प्राण्यांचे तोंड लांब का असते? कारण वाचून तुम्ही ही पडाल विचारात

Maharashtra Live News Update : मंत्री गिरीश महाजन शिक्षकांच्या आंदोलन स्थळी

SCROLL FOR NEXT