Lok Sabha Election 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : राज्यात सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदान तर या राज्यात झालं उच्चांकी मतदान; 7 वाजल्यानंतरही मतदान सुरू

Sandeep Gawade

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ जागांवर सायंकाळी ६ वाजता मतदान संपलं. या जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. 4 जूनला निकाल लागणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत 48.66 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 41.70 टक्के मतदान झालं तर दिंडोरीत सर्वाधिक 57.06 टक्के मतदान झाली आहे. मात्र पाच टप्प्यातील हे सर्वात निचांकी मतदान असून देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७३ टक्के मतदान झालं आहे. काही ठिकाणी ७ नंतरही मतदान सुरू होतं, त्यामुळे मतदानाचे आकडे थोडेफार वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात झालेलं मतदान

भिवंडी- 48.89 टक्के

धुळे- 48.81 टक्के

दिंडोरी- 57.06 टक्के

कल्याण - 41.70 टक्के

मुंबई उत्तर - 46.91 टक्के

मुंबई उत्तर मध्य - 47.32 टक्के

मुंबई उत्तर पूर्व - 48.67 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम - 49.79 टक्के

मुंबई दक्षिण - 44.22 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के

नाशिक - 51.16 टक्के

पालघर- 54.32 टक्के

ठाणे - 45.38 टक्के

देशात पाचव्या टप्प्यात झालेलं मतदान

बिहार - 52.35

जम्मू काश्मीर - 54.21

झारखंड - 61.90

लडाख - 67.50

महाराष्ट्र - 48.66

ओडिसा - 60.55

उत्तर प्रदेश - 55.80

पश्चिम बंगाल - 73.00

महाराष्ट्रासह काही ठिकाणी मतदान प्रक्रियेला विलंब झाला होता. त्यामुळे मतदानकेंद्राबाहेर रांगेत उभे असलेल्या मतदारांना ६ नंतरही मतदान करण्यासाठी केंद्र सुरू ठेवण्यात आली होती. मुंबई आणि नाशिकमध्ये मतदान केंद्रावर बराच गोंधळ पहायला मिळाला. मुंब्य्रात तर चार चार तास मतदारांना रांगेत उभा रहाव लागलं आहे. त्यामुळे सायंकाळी ७ नंतरही काही मतदारसंघात मतदान सुरू होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT