Supriya Sule News Saam TV
लोकसभा २०२४

Supriya Sule : राम कृष्ण हरी वाजवा तुतारी; अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर

Lok Sabha Election 2024 : सुनेत्रा पवार देखील उमेदवारी अर्ज दखल करणार असल्याची माहिती आहे. त्यावर कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत निवडणुक लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीये.

साम टिव्ही ब्युरो

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत निवडणुक लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शुभेच्छा आहेत. राम कृष्ण हरी वाजवा तुतारी, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

आज बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार देखील उमेदवारी अर्ज दखल करणार असल्याची माहिती आहे. त्यावर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत निवडणुक लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीये.

काय म्हणाले होते अजित पावार?

तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही मिळवून देऊ. मात्र त्यासाठी आमच्यासाठीचं मशिन मधलं बटन कचाकच दाबा, असं अजित पावारांनी म्हटलं होतं. एका प्रचारसभेवेळी त्यांनी असं वक्तव्य केलं. अजित पवारांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीये. त्यावर आता सुप्रिया सुळेंनी देखील राम कृष्ण हरी वाजवा तुतारी, असं एका वाक्यात उत्तर दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Maharashtra Live News Update: विना परवाना गावठी कट्टा आणि पोलिस गणवेश बाळगणाऱ्यास अटक

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

SCROLL FOR NEXT