Rahul Gandhi Saam Tv
लोकसभा २०२४

Rahul Gandhi News : मोठी बातमी! राहुल गांधी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा देणार? नेमकं कारण काय?

India Lok Sabha Election 2024 Results : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या दोन्ही ठिकाणी त्यांचा मोठा मताधिक्यांनी विजय झाला.

Satish Daud

लोकसभा २०२४ निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसला घसघशीत यश मिळालं. तब्बल ९९ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या दोन्ही ठिकाणी त्यांचा मोठा मताधिक्यांनी विजय झाला. मात्र, आता राहुल गांधी यांना कोणत्याही एका जागेचा खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

यामागे मोठं कारणही समोर आलं आहे. भारतीय संविधानानुसार, कोणत्याही उमेदवाराला एकापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवता येऊ शकते. पण त्याला निवडून आल्यानंतर त्या उमेदवाराला फक्त एकाच जागेचं प्रतिनिधित्व करता येऊ शकतं. घटनेच्या कलम १०१ (१) आणि लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ६८ (१) मध्ये हे स्पष्टपणे नमूद केले आहे.

राहुल गांधी हे रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळे आता त्यांना कोणत्याही एका मतदारसंघातून खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. याबाबत १४ दिवसांच्या आत राहुल गांधी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सचिवांना (ECI) लेखी कळवणे आवश्यक आहे.

तसे न केल्यास या कालावधीच्या शेवटी त्याची लोकसभेची जागा रिक्त मानली जाईल. यापूर्वी दिवंगत गुरचरण सिंग तोहरा यांनी १९९९ मध्ये दोन मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. यात दोन्ही जागांवर निवडून आले होते. पण त्यांनी एका जागेचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे त्यांची लोकसभेची एक जागा रिक्त घोषित करण्यात आली.

त्यामुळे आता राहुल गांधी यांना सुद्धा कोणत्याही एका जागेवरील खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. ते कोणत्या मतदारसंघातून राजीनामा देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ज्या मतदारसंघांमधून जास्त मताधिक्य असेल तो मतदारसंघ कायम ठेवण्याची गांधी घराण्याची परंपरा आहे. राहुल गांधी काय निर्णय घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT