Uddhav Thackeray Criticized PM Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray: 'वॉर तो रूकवा दी ना पापा, मग मणिपूर का धुमसतंय?' जाहिरातीवरून उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर निशाणा

Uddhav Thackeray Criticized PM Modi: उद्धव ठाकरे यांनी 'वॉर तो रूकवा दी ना पापा' या जाहिरातीवरून पीएम मोदींवर निशाणा निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

Rohini Gudaghe

उद्धव ठाकरे यांनी 'वॉर तो रूकवा दी ना पापा' या जाहिरातीवरून पीएम मोदींवर निशाणा निशाणा साधला आहे. युक्रेनमधील युद्ध थांबवलं, मग मणिपूर का धुमसतंय? असा खोचक सवाल जाहिरातीवरून उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींचा विचारला (Uddhav Thackeray Criticized PM Modi) आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. जर मोदींनी युद्ध थांबवलं असेल तर मग मणिपूरमध्ये अजुनही अशांतता का आहे? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

मागील वर्षभर मणिपूर धुमसत आहे. तेथील महिलांची इज्जत लुटली. त्यांची धिंड काढली गेली. आता परवासुद्धा मतदानाच्या दिवशीच हिंसाचार झाला आहे. तेथील मुख्यंत्री स्वत: या घटना झाल्याचं सांगत आहे. गृहमंत्री तिकडे दौरा करून आले, तरी माहिती पडलं नाही का? असं देखील उध्दव ठाकरेंनी विचारलं आहे. व्हिडिओ समोर आले नसते, तर जगाला काही कळालं देखील नसतं. तिथे महिलांवर आणि लोकांवर अत्याचार होत आहेत. दडपशाही एवढी वाढलीय की, बातम्या बाहेर येऊ दिल्या जात नाही. मणिपूर अजून देखील अशांत आहे. परंतु त्याबदद्ल कुणीच बोलत नसल्याचं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) म्हटलं आहे.

त्यांना देशाला गुलाम बनवायचं आहे. भूक लागली की त्यांची गरज पडली पाहिजे. पोट भरण्यासाठी दुसरं साधन ठेवणार नाही. उद्योगधंदे बाहेर नेत आहेत. विरोधकांची गुलाम बनविण्याची निती असल्याचं ठाकरेंनी सामनाला (Saamana Interview) दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. देशाचं संविधान बदलण्यासाठीच त्यांना चारशे पार हवे आहेत, असा घणाघात ठाकरेंनी भाजपवर केला आहे. महाराष्ट्राचे बाहेर गेलेले उद्योग परत आणायचे आहेत. महाराष्ट्राचं वैभन, आर्थिक केंद्र परत आणायचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं. पिकांना योग्य तो हमीभाव दिला होता. त्यानंतर मात्र आता जीएसटीच्या माध्यमातुन लुट होत असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे. विरोधकांच्या मनात महाराष्ट्रद्वेष डोकावत आहे. संविधानाबद्दल आकास आहे. भारतीय जनता पक्षाची पावलं हुकुमशाहीच्या दिशेने पुढे जात असल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे. देशात आधी परकीयांची गुलामगिरी होती, आता स्वकीयांची गुलामगिरी येईल. त्यामुळे हुकुमशहाला हरवावं (Lok Sabha 2024) लागेल, असं परखड भाष्य त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींवर केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

SCROLL FOR NEXT