Chandrakant Borade Join Shinde Group Saam Tv
लोकसभा २०२४

Kalyan Politics: शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; कल्याणमधील पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश

Chandrakant Borade Join Shinde Group: ऐन निवडणूकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कल्याण येथील पदाधिकाऱ्याने प्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Rohini Gudaghe

Maharashtra Politics Lok Sabha Election 2024

ऐन निवडणूकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला (Shiv Sena Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कल्याण येथील पदाधिकाऱ्याने शिंदे गटात प्रवेश केला आहे. (latest politics news) शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोराडे यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यानंतर बोराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ठाकरे गटाला मोठा धक्का

यावेळी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, शिंदे गडाचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे तसेच कल्याण डोंबिवली उल्हासनगर मधील पदाधिकारी उपस्थित (Chandrakant Borade Join Shinde Group) होते. सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ऐन निवडणूकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

आता चंद्रकांत बोडारे हे शिवसेना शिंदे गटात सामील झाले आहे. परंतु त्यांचे लहान बंधू आणि कल्याण जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे हे शिवसेना ठाकरे गटातच राहणार (Maharashtra Politics) असल्याची माहिती मिळतेय. चंद्रकांत बोडारे यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणूकांची तारीख जाहीर

शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण येथील पदाधिकारी चंद्रकांत बोडारे शिवसेना शिंदे (Kalyan Politics) गटाच्या वाटेवर आहेत, अशा चर्चा सुरू होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम बसला (Lok Sabha Election 2024) आहे.

यामुळे आता राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणूकांची तारीख जाहीर झाली आहे. सर्व राजकीय पक्ष निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच पक्ष कामाला लागले (Lok Sabha 2024) आहे. लोकसभेसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता अनेक उमेदवारांच्या प्रचाराला देखील सुरूवात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माजी उपराष्ट्रपतींना नजर कैदेत ठेवलंय, ते सुरक्षित नाहीत'; बड्या खासदाराचं अमित शहांना पत्र, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: महादेवी हत्तीणी प्रकरणाची सुनावणी गुरुवारी होणार

Today Gold Rate: रक्षाबंधनानंतर सोन्याचे दर ७६०० रुपयांनी घसरले; १० तोळ्याचा आजचा भाव किती?

Chhatrapati Shivaji Terminus: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे आधीचे नाव काय होते? वाचा इतिहास

Radha Ashtami 2025 : राधा अष्टमी २०२५ कधी आहे? जाणून घ्या पूजा, मुहूर्त व महत्त्व

SCROLL FOR NEXT