Jalana Loksabha News: Saamtv
लोकसभा २०२४

Loksabha Election: नाराजी नाट्यावर पडदा! रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांमध्ये पुन्हा मनोमिलन; एकत्रित प्रचार करणार?

Jalna Loksabha News: नेत्यांना एकत्र आणताना पक्षश्रेष्ठींची दमछाक होताना दिसत आहे. अशातच जालन्यात कट्टर विरोधक असलेले रावसाहेब दानवे आणि शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे मनोमिलन झाल्याचं सांगण्यात येत आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना|ता. ३ मे २०२४

राज्यात सध्या लोकसभेचा रणसंग्रास सुरू आहे. महायुतीकडून मिशन ४५ प्लसचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. मात्र स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गट, भाजप तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांमध्ये खदखद, नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे, त्यामुळे नेत्यांना एकत्र आणताना पक्षश्रेष्ठींची दमछाक होताना दिसत आहे. अशातच जालन्यात कट्टर विरोधक असलेले रावसाहेब दानवे आणि शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे मनोमिलन झाल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा शिवसेनेत युती असली तरी जालन्यात मात्र शिंदे- गट भाजपमध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत होते. जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर नाराज असल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू होते. तसेच त्यांनी प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे या लोकसभा निवडणुकीतही रुसव्या फुगव्याचे चित्र दिसत असताना अर्जुन खोतकर यांची नाराजी कशी दूर करणार? याबाबत मतदारसंघात चर्चा रंगत होत्या. अशातच रात्री उशिरा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थान असलेल्या दर्शना बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याचे समोर आले आहे. तब्बल दोन तास चर्चा केल्यानंतर अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, जालना लोकसभा मतदार संघात रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे कल्याण काळे यांचे आव्हान आहे. रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्जुन खोतकर हे नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या प्रचारातही भाग घेतला नव्हता. त्यामुळे आता या मनोमिलनानंतर अर्जुन खोतकर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रचारात सक्रिय होतात का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hyperloop Rail: देशातील पहिली हायपरलूप रेल्वे कधी धावणार? जाणून घ्या नव्या रेल्वेचा मार्ग

Ration Card Holder: राज्यातील 3 हजार रेशन कार्डधारकांना नाही मिळणार रेशन; काय आहे कारण?

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं; मनोज जरांगे समर्थकांकडून बीड जिल्हा बंदची हाक, VIDEO

EPFO 3.0 लाँन्च होण्यास का होतोय विलंब? कोणत्या पाच नियमात होतील बदल? जाणून संपूर्ण माहिती

Horrific : दुहेरी हत्याकांडाने खळबळ; घरगुती वादातून जावयाने केली मायलेकीची हत्या

SCROLL FOR NEXT