Jayant Patil News Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: आमचं सरकार आलं तर शेती अवजारांवर कोणताही टॅक्स आणि जीएसटी द्यावा लागणार नाही: जयंत पाटील

Jayant Patil News: ''आमचं सरकार आलं तर शेती अवजारांवर कोणताही टॅक्स आणि जीएसटी द्यावा लागणार नाही. असं आम्ही जाहीरनाम्यात नमूद केलं आहे'', असं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Politics:

>> विजय पाटील

''आमचं सरकार आलं तर शेती अवजारांवर कोणताही टॅक्स आणि जीएसटी द्यावा लागणार नाही. असं आम्ही जाहीरनाम्यात नमूद केलं आहे'', असं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले आहेत. आज शरद पवार गटाची हातकणंगले लोकसभा क्षेत्रात प्रचार सभा पार पडली. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले आहेत की, ''उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब हे एकत्र असल्याने प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सर्वच ठिकाणी चांगला रिपोर्ट येत आहे. महाविकास आघाडीला यावेळी निवडून द्यायचा आहे, असे लोक म्हणत आहेत.''

जयंत पाटील म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले एफआरपी मी वाढवली. पण त्यांना माहीत नाही, शरद पवार यांनी असा फॉर्म्युला करून ठेवले आहे की, दरवर्षी एफआरपी वाढत असते. शरद पवार हे त्यांना सांगायला विसरले असतील.''

पाटील पुढे म्हणाले, ''जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. लोकसंख्या प्रमाणे आरक्षण द्यावं, जे वाद निर्माण झाले आहेत. ते मिटून जातील.'' ते म्हणले, ''या सरकारने जे प्रश्न निर्माण केले ते आम्ही व्यवस्थित करू. पण पुन्हा कमळ आले, तर या देशातील पेट्रोल 110 वर जाईल. गॅस दीड किंवा 2 हजार करतील.''

नागरिकांना आवाहन करत जयंत पाटील म्हणाले, ''देशाचं संविधान वाचवायचे असेल तर विचार करून मतदान करा.'' ते म्हणाले, ''देशाचे पंतप्रधान हे शरद पवार यांच्यावर देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन टीका करतात. नरेंद्र मोदी जेव्हा मतपेटी उघडतील, त्यावेळी 35 जागा महाविकास आघाडीच्या आलेल्या असतील.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT