Pm Modi's Public Meeting in Satara:
मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. इंडिया आघाडी आणि काँग्रेस सातत्याने मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर संविधान बदलतील, असा आरोप करत आहेत. यावरच आज सातारा येथील प्रचार सभेत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधत, असं म्हटलं आहे.
मोदी म्हणाले की, ''काँग्रेस आणि आघाडीवाल्यांनो नीट ऐका, जोपर्यंत मोदी जिवंत आहेत आणि जोपर्यंत मला जनतेचा आशीर्वाद आहे. तोपर्यंत तुम्ही धर्माच्या नावावर आरक्षण आणण्याचा प्रयत्न करू शकणार नाही किंवा संविधान बदलू शकणार नाही.''
ते म्हणाले, ''तेव्हा काँग्रेसचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह म्हणाले होते, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये. म्हणजे गरीब उपाशी मेला तर मरो, धान्य सडले तर सडो, पण काँग्रेस सरकार गरिबांना धान्य द्यायला तयार नव्हते. आज आपले सरकार दरमहा 80 कोटी गरजू लोकांना मोफत अन्नधान्य पुरवते.''
मोदी म्हणाले, ''1947 मध्ये देश स्वतंत्र झाला. मात्र काँग्रेसने गुलामगिरीची मानसिकता देशात वाढू दिली होती. छत्रपती महाराजांच्या नौदलावर साऱ्या जगाचा विश्वास होता, पण इतकी वर्षे स्वतंत्र भारताच्या नौदलाच्या ध्वजावर ब्रिटिशांचे चिन्ह होते. मी आल्यानंतर इंग्रजांच्या या चिन्हात बदल केला. आपल्या नौदल ध्वजावर छत्रपती शिवाजीच्या चिन्हाला स्थान दिल्यावर या ध्वजाची ताकद वाढेल, असा निर्धार मी केला.''
ते म्हणाले आहेत की, ''काँग्रेस सरकारची गरिबांप्रती काय वृत्ती होती, याचा अंदाज त्यांच्या धोरणांवरून येऊ शकतो. काँग्रेसची सत्ता असताना सरकारी गोदामांमध्ये हजारो टन धान्य सडायचे. मात्र काँग्रेस सरकार ते गरिबांना द्यायला तयार नव्हते. काँग्रेस सरकारने गरिबांमध्ये धान्य वाटप करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.''
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.