Jayant Patil Meets Rajendra Patil Yadravkar: Saamtv
लोकसभा २०२४

Jayant Patil News: हातकणंगलेत जयंत पाटलांचा नवा डाव.. थेट शिंदे समर्थक आमदाराची घेतली भेट; धैर्यशील मानेंच्या अडचणी वाढणार?

Jayant Patil Meets Rajendra Patil Yadravkar: हातकणंगले मतदार संघात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही थेट शिंदे गटाचे समर्थक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, प्रतिनिधी|ता. १२ एप्रिल २०२४

Hankanangale Loksabha Constituency News:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेरजेचे राजकारण करत जुन्या मित्रांची, राजकीय शत्रूंची भेट घेत डावपेच टाकण्यास सुरूवात केली आहे. अशातच आता हातकणंगले मतदार संघात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही थेट शिंदे गटाचे समर्थक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. राजेंद्र पाटील यांच्या जयसिंगपूरमधील निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीवेळी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटीलही उपस्थित होते.

या भेटीमध्ये जयंत पाटील यांच्याकडून हातकणंगलेचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना मदतीसाठी आमदार राजेंद्र यड्रावकरांना साकडं घातल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हातकणंगले मतदार संघातून शिंदे गटाचे धैर्यशील माने (Dhairyashil Mane) हे उमेदवार आहेत. मात्र धैर्यशील माने यांच्या नावाला मोठा विरोध पाहायला मिळाला होता.

धैर्यशील माने यांच्यावरील नाराजीमुळे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांचे नाव देखील हातकणंगले लोकसभेसाठी चर्चेत होते. परंतु शेवटच्या क्षणी पुन्हा धैर्यशील माने यांनाच उमेदवारी देण्यात आली. अशातच आता जयंत पाटील यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT