gadhinglaj bjp karyakarta opposes shivsena mp sanjay mandlik candidate to contest election in kolhapur lok sabha constituency  saam tv
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha Election 2024 : भाजप नेते म्हणू लागलेत 'हीच ती वेळ', कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 'कमळ' हवे; संजय मंडलिकांना गडहिंग्लजमधून विराेध

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Lok Sabha Constituency :

काेल्हापूर लाेकसभा मतदारसंघात (kolhapur lok sabha constituency) खासदार संजय मंडलिक (shivsena mp sanjay mandlik) हे उमेदवार नकाे. या मतदारसंघात कमळ चिन्हावर उमेदवार द्यावा असा उघड विराेध शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना भाजप कार्यकर्त्यांनी गडहिंग्लज तालुका भाजप कार्यकर्ता मेळाव्यात (gadhinglaj taluka bjp karyakarta melava) केला आहे. त्याबाबतचा ठराव देखील भाजप कार्यकर्त्यांनी करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (bjp leader devendra fadnavis) यांना पाठवावा असे नमूद केले आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार असणार हे निश्चित आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. 15 मार्च) मेळावा घेत महायुतीची उमेदवारी मिळाली तर ठीक अन्यथा स्वबळावर निवणुक लढवावी असा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या उमेदवारीला भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य संग्रामसिंह कुपेकर (sangramsinh kupekar) यांनी नुकताच विरोध दर्शवला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गडहिंग्लज तालुक्यातील हसूरचंपू येथील बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात कुपेकर यांनी उघडपणे विरोध दर्शवला. दुसरा कोणीही उमेदवार चालेल परंतु ताे भाजपच्या कमळ चिन्हावर लढवणारा असावा असेही कुपेकर यांनी नमूद केले. कुपेकर यांच्या मागणीला उपस्थितांनी पाठिंबाही दर्शविला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT