Prithviraj Chavan Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election: भाजपला बहुमताचा आकडा गाठणं कठीण, अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

Satish Kengar

Prithviraj Chavan On BJP:

लोकसभा निवडणुकीबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. राज्यात महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपला बहुमताचा 272 चा आकडा गाठणं अवघड आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

अजित पवार गटावर भाष्य करताना ते म्हणाले की, अजित पवार गटाच्या एकही जागा निवडून येणार नाही. शिंदे गटाच्या 3 ते 4 जागा निवडून येऊ शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. साम टीव्हीशी संवाद साधताना त्यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ''महाविकास आघाडीच्या चांगल्या जागा निवडून येतील. तिन्ही पक्षाचे मिळून एकूण 32 किंवा त्यापेक्षा जास्त जागा निवडून येतील, असं मी आता भाकीत करत आहे.''

भाजपच्या 400 पारच्या घोषणेवर चव्हाण म्हणाले, ''400 पार ही फक्त घोषणा आहे. विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर, भारतीय जनता पक्ष नेहमीच वाढून आकडा सांगता आला आहे. यात त्यांनी 200 पार, 300 पारच्या घोषणा दिल्या, मात्र प्रत्यक्षात निम्म्यापेक्षा कमी जागा त्यांच्या निवडून आल्या. ''

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, ''ही निवडणूक पूर्ण वेगळी झाली आहे. त्यांना देशात 272 जागा मिळणार नाही. त्यांना 370 जागा संविधान बदलायला हव्यात का? अशीही चर्चा आहे. मुस्लिम, दलित यांना संविधान बदलायची भिती वाटते.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

Indian Army Job: बक्कळ पगार अन् इंडियन आर्मीत नोकरी करण्याची संधी; अशी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: अतुल बेनके घड्याळावर लढणार, प्रचाराला सुरुवात; म्हणाले दादा-साहेबांना एकत्र आणणार!

SCROLL FOR NEXT