Dhananjay Munde Beed Rain Sabha Saam TV
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: परळीत धनंजय मुंडेंची भर पावसात सभा; बहिणीच्या प्रचारासाठी भाऊ भिजला; बीडमधील समीकरणं बदलणार?

Beed Lok Sabha Election 2024: पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी भर पावसात भाषण केलं. त्यांच्या पावसातीलसभेची आता जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी १३ मे रोजी होणार आहे. आज शनिवार प्रचाराचा अखेरचा दिवस असून सायंकाळी ६ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. शेवटच्या दिवशी सभा घेण्यासाठी राजकीय नेत्यांची धडपड सुरू आहे. अशातच बीड लोकसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर आली आहे.

बीडमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सभा घेतली. परळी शहरातील बरकत नगर भागात मुंडेंनी ही सभा घेतली. विशेष म्हणजे सभा सुरू असताना पाऊस सुरू झाला. मात्र, तरी देखील धनंजय मुंडे यांनी भर पावसात भाषण करत उपस्थितांना संबोधित केलं.

सभेसाठी उपस्थित असलेल्या परळीकरांनी देखील धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं भाषण शेवटपर्यंत ऐकलं. भर पावसात परळीकर धनंजय मुंडे यांचे भाषण ऐकण्यासाठी ठाण मांडून होते. धनंजय मुंडे यांच्या या सभेने २०१९ मधील शरद पवार यांच्या साताऱ्यामधील पावसातील सभेची आठवण करून दिली.

२०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक सुरू असताना देशात मोदी लाट होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीत गुंडाळले जाणार, असं अनेकांचं मत होतं. मात्र, शरद पवार यांच्या पावसातील सभेने ऐनवेळी ही निवडणूक फिरवली होती. आता धनंजय मुंडे यांनी देखील पावसात सभा घेतल्याने बीडमधील राजकीय समीकरण बदलणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, बीडच्या विकासासाठी पंकजा मुंडे यांना साथ द्या. मला विधानसभेला जेवढी मते तुम्ही दिली, त्यापेक्षा अधिक मते देऊन पंकजा मुंडे यांना विजयी करा, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी बीडकरांना केलं. पंकजा मुंडे यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यासोबत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT