dhananjay mahadik criticizes satej patil kolhapur lok sabha election Saam Digital
लोकसभा २०२४

Dhananjay Mahadik Vs Satej Patil: मुश्रीफांवर झालेल्या अन्यायाचा धनंजय महाडिकांनी वाचला पाढा, कागलकरांना वचपा काढण्याचं केलं आवाहन

कोल्हापूर लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ खासदार धनंजय महाडिक हे कागल येथे आयाेजिलेल्या मेळाव्यात बाेलत हाेते.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Lok Sabha Election :

सन 2019 साली ज्यावेळी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत गेले. सत्ता स्थापन केल्यानंतर कोल्हापूरचा पालकमंत्री होण्याचा मान कोणाचा होता? पाच वर्ष निवडून आलेल्या मुश्रीफ यांचा होता की दीड वेळा आमदार राहिलेल्या आमदारांचा असा सवाल करीत मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांचा ताेंडचा घास पळवून नेणा-याचा कागलकरांनी वचपा काढावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांनी काॅंग्रेसचे आमदार सतेज पाटील (satej patil) यांचे नाव न घेता टीका केली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

कोल्हापूर लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ खासदार धनंजय महाडिक हे कागल येथे आयाेजिलेल्या मेळाव्यात बाेलत हाेते. महाडिक म्हणाले आम्ही नेहमीच सांगत आलो आहे, पण तुम्हाला वाटतंय महाडिक कायतर सांगतात पण हा व्यक्ती आत्मघातकी आहे, द्वेशी आहे, नेहमी सुडद्धीने वागतो अशी टीका सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता महाडिक यांनी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खासदार धनंजय महाडिक पुढं बाेलताना म्हणाले सन 2019 साली ज्यावेळी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत गेले. सत्ता स्थापन केल्यानंतर कोल्हापूरचा पालकमंत्री होण्याचा मान कोणाचा होता. पाच वर्ष निवडून आलेल्या मुश्रीफांचा होता की दीड वेळा आमदार राहिलेल्या आमदाराचा. मुश्रीफ प्रमुख आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख होते. मुश्रीफ यांना पालकमंत्री मिळू नये म्हणून काय खटाटोप केलेत ते मला माहिती आहे असा गाैफ्यस्फाेट महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव घेता केला.

कागलकरांनी वचपा काढला पाहिजे : धनंजय महाडिक

मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री आणि ते राज्यमंत्री असताना सुद्धा पालकमंत्री पद त्यांनी घेतलं. मुश्रीफ यांना अहमदनगरला जावं लागलं. मुश्रीफ यांच्या तोंडातला घास त्यांनी काढून घेतला. त्यामुळे कागलकरांनी या गोष्टीचा वचपा काढला पाहिजे त्याची संधी आहे असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT