महाविकास आघाडीतील मतभेत उघडपणे समोर येऊ लागले आहेत. ठाकरे गटाने लोकसभेसाठीची आपली पहिली यादी जाहीर केली. यावरुन काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचा दावा असलेल्या जागांवर ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजीचे पडसाद उमटू लागले आहेत. महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना ठाकरे गटाने मुंबई आणि सांगलीच्या जागा जाहीर करणे चुकीचं असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ठाकरे गटाने आपल्या निर्णयचा फेरविचार करावा. हे आम्हाला पटलेलं नाही. भिवंडीची जागा अजूनही आमचीच आहे, असे आम्ही समजतो. आघाडीधर्म म्हणून आमच्या मित्रांनीही काळजी घेतली पाहिजे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
सांगलीच्या जागेबाबत दिल्लीशी चर्चा करू. कदाचित विश्वजीत कदम दिल्लीला गेलेत. दिल्लीच्या वरिष्ठांकडून चर्चा करून निर्णय घेऊ. आघाडी म्हणून पुढे जाणे ही काळाची गरज आहे, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. (Lok Sabha Election 2024)
महाविकास आघाडीत जागावाटप चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि सांगलीतील दोन जागांवर उमेदवार जाहीर केले. उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला असता तर बरे झाले असते. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित केले यामुळे आघाडी धर्माला गालबोट लागले. यावर त्यांनी पुनर्विचार करावा, असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं.
अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी देखील नाराजी व्यक्त केली. काँग्रेस ठाकरे गटासमोर झुकली आहे. ठाकरे गटाला मदत न करण्याची भूमिका संजय निरुपम यांनी घेतली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवारावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अशा उमेदवारासाठी आम्ही काम करणार नाही, असं संजय निरुपम यांनी म्हटलं.
मुंबईत शिवसेना ६ पैकी ५ जागा लढवणार हा काँग्रेसला गाडून टाकणारा निर्णय आहे. काँग्रेसला आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतो की नाही, याची चिंता नाही. पक्ष वाचवायचा असेल तर आघाडी तोडा, असंही निरुपम यांनी म्हटलं. मी एक आठवडा वाट पाहीन. त्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल. पुढील आठवड्यात भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही संजय निरुपम यांनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.