Rahul Gandhi, Sonia Gandhi and Mallikarjun Kharge  Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election: चमत्कार काँग्रेसला तारणार? निकालापूर्वी काँग्रेसचा अंतर्गत अहवाल, महाराष्ट्रात चांगल्या कामगिरीचा विश्वास

Congress News: लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशात काँग्रेसचा अंतर्गत अहवाल समोर आलायं. या अहवालात काँग्रेसला महाराष्ट्रासह बिहार आणि उत्तर प्रदेशात चांगल्या कामगिरीची आशा आहे.

Satish Kengar

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. अशात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय. इंडिया आघाडीच्या किती जागा येतील? यावर कांग्रेसचा अहवाल आल्याची माहिती आहे आणि या अहवालात कांग्रेसला महाराष्ट्रात चमत्कार होण्याचा अंदाज वर्तवलाय.

काँग्रेस पक्षाचा अंतर्गत सर्वे आणि वॉररुमच्या अहवालानुसार, काँग्रेसला महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशात चमत्काराची आशा आहे. या तीन राज्यांत आपल्याला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळेल, असं काँग्रेसला वाटतंय.

काँग्रेसच्या अंतर्गत अहवालात काय?

काँग्रेसच्या या अहवालात सांगण्यात आलं आहे की, पक्षाची महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेससह मित्र पक्षांना सर्वाधिक जागांची आशा आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, काँग्रेसला राज्यघटनेच्या मुद्याचा लाभ मिळू शकतो. मायावतींच्या मतपेढीला खिंडार पाडण्यात यश काँग्रेसला मिळू शकतं. बिहारमध्ये लालूंच्या पाठिंब्यानं भाजप, नितीशकुमारांच्या जागा कमी होऊ शकतात, अशी आशा काँग्रेसला आहे.

यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही भाष्य केलंय. नाना पटोलेंनी राज्यात जवळपास 40 च्या वर जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार असल्याचं जाहीर केलं. पटोले म्हणाले आहेत की, राज्यात मविआला 40च्या वर जागा मिळतील,देशात इंडिया आघाडीलाही 300 पेक्षा अधिक जागा मिळतील.

गेल्या 2 निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला यंदा चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. मागील निवडणुकीत ज्या राज्यात काँग्रेसनं चांगले यश मिळवलं त्या राज्यासह उत्तरेकडील काही राज्यात काँग्रेस मोठी अपेक्षा ठेवून आहे. आता काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केलेला विश्वास किती खरा ठरतो याच उत्तर 4 जूनलाच मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT