Devyani Farande Vs Vasant Gite  Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: मुंबई, नाशिकमध्ये मविआ आणि भाजप कार्यकर्त्यांचा राडा; काँग्रेस कार्यकर्त्याने धमकावलं, BJP चा आरोप

BJP Vs Thackeray Group: मुंबई आणि नाशिकमध्ये मविआ आणि भाजप आमने-सामने आले आहेत. मुंबईत काँग्रेस व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत भाजप कार्यकर्त्यांचा राडा झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई आणि नाशिकमध्ये मविआ आणि भाजप आमने-सामने आले आहेत. मुंबईत काँग्रेस व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत भाजप कार्यकर्त्यांचा राडा झाला आहे. तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सायन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्याने धमकावल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे. भाजप आमदार प्रसाद लाड हेही सायन पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

तर नाशिकमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय. फरांदे या मतदान कार्ड तपासत असल्याचा आरोप होत असून, यावरूनच वाद झाल्याची माहिती मिळतेय.

कुलाबा विधानसभा मतदारसंघातही राडा

दक्षिण मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातही आज राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची पन्नास खोके एकदम ओक्के म्हणून घोषणाबाजी केली. यानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळण्यास सुरुवात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल नार्वेकर हे मतदान केंद्रावर आढावा घेण्यासाठी आल्यानंतर किरकोळ कारणांवरून भाजप व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी झाली. वेळीच पोलिसांनी मध्यस्थीकरत प्रकरण हाताळले. म्युनसिपल सेंकडरी स्कूल येथील मतदान केंद्रावर घडला हा प्रकार घडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT