Sandipan Bhumre Criticizes Chandrakant Khaire Saam TV
लोकसभा २०२४

Maharashtra Politics : चंद्रकांत खैरेंचा पराभव होतोय, त्यांनी हिमालयात जाण्याची तयारी ठेवावी; संदिपान भुमरेंचा टोला

Sandipan Bhumre Criticizes Chandrakant Khaire : छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचाच उमेदवार निवडून येणार चंद्रकांत खैरेंची हिमालयात जाण्याची तयारी पूर्ण झाली आहे, असा टोला संदिपान भुमरे यांनी लगावला आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रात महायुती की महाविकास कुणाला सर्वाधिक जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचाच विजय होईल, असा अंदाज एक्झिट पोलच्या आकडेवारीतून समोर आला आहे.

एक्झिट पोलच्या या आकडेवारीवर संदिपान भुमरे यांनी भाष्य केलं आहे. "एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो त्याच्यापेक्षा निकालातील आकडेवारी महत्वाची आहे. मला खात्री आहे की, उद्या जो निकाल येईल त्यात इथे महायुतीचा उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येईन", असा विश्वास भुमरे यांनी व्यक्त केला आहे.

"निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चंद्रकांत खैरे म्हणाले होते की, यावेळी मी निवडून नाही आलो तर हिमालयात जाईल. आता आम्ही त्यांना हिमालयात पाठवण्याची तयारी पूर्ण केली आहे. आम्ही त्यांना निरोप देण्यासाठी सज्ज आहोत. त्यांना जे साहित्य लागेल ते सुद्धा आम्ही देणार आहोत", असा टोला संदिपान भुमरे यांनी लगावला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये चौरंगी लढत

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. चंद्रकांत खैर या मतदारसंघातून ४ वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. मात्र २०१९ निवडणुकीत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा अत्यंत कमी फरकाने पराभव केला होता.

अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे खैरेंचा पराभव झाल्याचं समोर आलं होतं. आता शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर दोन्ही पक्षांनी या मतदारसंघातून आपआपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे यंदाही संभाजीनगरमध्ये चौरंगी लढत होत आहेत. या लढतीत नेमका कोणत्या पक्षाचा उमेदवार बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

Virar Dahanu Local : वलसाड एक्स्प्रेसच्या इंजिनला आग; विरार ते डहाणू लोकलसेवा ठप्प, प्रवाशांचे हाल

Pune: आमदार माऊली कटकेंच्या पत्नीचे २ ठिकाणी मतदार यादीत नाव, अशोक पवार यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT